`Manike Mage Hithe` गाण्यावर शिल्पाचा गीता माँ सोबत भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आजकाल सुपर डान्सर चॅप्टर 4 चे परिक्षण करताना दिसत आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आजकाल सुपर डान्सर चॅप्टर 4 चे परिक्षण करताना दिसत आहे. शिल्पाच्या शोमध्ये सह-परिक्षक गीता कपूर आणि अनुराग बासू यांच्यासोबत नेहमीच खास बॉन्डिंग दिसून येते. शिल्पा शेट्टीने आता सुपर डान्सर 4 च्या स्टेजवरून गीता कपूरसोबत डान्स करतानाचा एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये शिल्पा आणि गीता दोघेही या गाण्याचा प्रचंड आनंद घेताना दिसत आहेत.
गीता कपूरसोबत शिल्पा शेट्टीचा जबरदस्त डान्स
शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर गीता कपूरसोबत ट्रेंडिंग व्हायरल झालेल्या 'Manike Mage Hithe' या गाण्यावर डान्स करतानाचा रील व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये शिल्पा आणि गीता या सुपरहिट गाण्यावर एकमेकांसोबत डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत. चाहत्यांना दोघांचाही डान्स व्हिडिओ खूप आवडतो.
चाहते देखील कमेंट सेक्शनमध्ये हृदयाच्या इमोजीसह आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. 'Manike Mage Hithe' हे गाणे सध्या खूप व्हायरल होत आहे. अनेक सेलेब्स या गाण्यावर रील व्हिडिओ बनवण्याची संधी सोडत नाहीत.