मुंबई : बॉलिवूड क्विन कंगणा रनौत तिचा आगामी चित्रपट 'मणिकर्णिका : द क्विन ऑफ झासी'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या प्रमोशनवेळी कंगणाने #MeToo चळवळीबाबत बोलताना प्रत्येक महिलेने आपले संरक्षण स्वत: करायला हवे तसेच याबाबत लहान मुलींनाही माहिती दिली गेली पाहिजे, असे म्हटले. #MeToo चळवळीच्या आधीही याप्रकरणातील अनेक नावे समोर आली होती. परंतु, कोणीही याबाबत बोलायला तयार नव्हते. मात्र, आता याबाबत अनेक लोक खुलेपणाने बोलू लागले आहेत. त्यामुळे असा कोणताही प्रकार करताना लोक विचार करतील असे कंगणाने म्हटले. दरम्यान, एका कार्यक्रमावेळी आपल्यालाही गर्दीतील एका व्यक्तीने चुकीचा स्पर्श केल्याचे तिने सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री राणी मुखर्जीने #MeToo वर दिलेल्या प्रतिक्रियेने अनेकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले होते. महिला सशक्तीकरणावर बोलणाऱ्या महिलेलाच जेव्हा ट्रोल केले जाते त्यावेळी अतिशय दुःख होते. महिलांनी त्यांचे विचार खुलेपणाने सर्वांसमोर मांडायला हवेत. गेल्या काही दिवसांत #MeToo चळवळीमुळे अभिनेत्रींना ट्रोल केले गेले आणि ज्याप्रकारे त्यांनी या परिस्थितीचा सामना केला त्याचेही कंगणाने कौतुक केले.


येत्या २५ जानेवारी रोजी 'मणिकर्णिका : द क्विन ऑफ झासी' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. २२५ कोटी बजेट असलेला हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात अडकला आहे. या चित्रपटात कंगणा राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारणार आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असून, झाशीची राणीची इंग्रजांविरूद्ध लढाई चित्रपटात दाखवण्यात आली आहे.