Tumbbad Theatrical Re-release: lएक उत्कृष्ट कलाकृती म्हणून ओळखला जाणारा 'तुंबाड' हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. निर्मात्यांनी त्यासंबंधीत पोस्टर रिलीज करून तारीख जाहिर केली आहे. एक आकर्षक भयानक नवीन पोस्टर रिलीज करत त्यांनी 'तुंबाड' चित्रपट 13 सप्टेंबर 2024 ला पुन्हा एकदा चित्रपट गृहात प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. या पुनरागमनामुळे चाहत्यांना आणि नवोदित प्रेक्षकांना या चित्रपटाचा पुन्हा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. 'तुंबाड'मधील जग काल्पनिक, पौराणिक, गावातील आहे. यात भय आणि काल्पनिक गोष्टीचे अनोखे मिश्रण असलेले कथानक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तुंबाड' चित्रपट 2018 मध्ये जेव्हा प्रदर्शित झाला होता तेव्हा बॉक्स ऑफिसवर खुप यशस्वी झाला नव्हता. त्यावेळी प्रेक्षकांपर्यंत या चित्रपटाचे कथानक फारसे नीट पोहोचले नव्हते. पण त्यानंतर ओटीटीवर आणि इतर ठिकाणी हा चित्रपट आल्यावर लोकांनी याला खुप पसंती दिली. अनेक तज्ञ लोकांनी कौतुकही केले. 'तुंबाड' हा वेगळ्या धाटणीचा आणि आशयाचा चित्रपट आहे. एक गुढ वलय असलेला हा चित्रपट मुळात भयपट आहे. ही सृष्टीच्या जन्माची कथा आहे. चित्रपटाची कथा, रंगसंगती, संगीत, संवाद, छायांकन आणि संपूर्ण चित्रपट एक विलक्षण अनुभव आहे. आणि हा अनुभव पुन्हा एकदा घ्यायची संधी 13 सप्टेंबर 2024 पासून मिळणार आहे. 'तुंबाड'चे नवीन पोस्टर सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.



 


या चित्रपट अनिल बर्वे दिग्दर्शित, आनंद गांधी क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि आदेश प्रसाद सह-दिग्दर्शक म्हणून, चित्रपटाचे लेखन मितेश शाह, प्रसाद बर्वे आणि गांधी यांनी केले होते आणि सोहम शाह, आनंद एल. राय, मुकेश शाह यांनी निर्मिती केली होती. या चित्रपटात सोहम शहा, पियुष कौशिक, हर्ष, अनिता दाते-केळकर, दीपक दामले, रुद्र सोनी, ज्योती माळशे, माधव हरी, रोंजिनी चक्रवर्ती हे कलाकार आहेत. प्रमुख भुमिकेतील कलाकारांसह इतर कलाकारांचा अभिनयही या कथेला खास बनवतो. 'तुंबाड'ला  64 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये आठ नामांकने मिळली आणि सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन यासाठी पुरस्कार मिळवले. 75 व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही तुंबाडचा प्रीमियर झाला होता, या महोत्सवात प्रदर्शित होणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरला.