मुंबई : "प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं" असं अनेकजण म्हणायचे पण खरंच सगळ्यांचं प्रेम सेम असतं का? जर प्रेम सेम असेल तर ब्रेकअप पण सेम असतं का? मनापासून जोडलेलं नातं जेव्हा तुटतं किंवा ब्रेकअप होतं तेव्हा त्या व्यक्तीला काय वाटत असेल... ती व्यक्ती मनाने किती खचून गेली असेल... असंच काहीसं झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता विनय प्रतापराव देशमुख याच्यासोबत आणि म्हणूनच तो बोलतोय "चांगली खेळलीस तू... भावनांशी माझ्या चांगली खेळलीस तू...!"


विनय प्रतापराव देशमुख आणि माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेत्री रुचिरा जाधव या जोडीचं 'चांगली खेळलीस तू' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.. 


गेले दोन वर्ष लॉकडाऊनची परिस्थिती असल्यामुळे मनोरंजन क्षेत्राशी निगडीत गोष्टींना जरा ब्रेक लागला होता. लॉकडाऊनच्या पूर्वी सिनेमा, संगीत यांचा प्रकाशनसोहळा मोठ्या उत्साहात आयोजित केला जायचा. सुरक्षिततेच्या दृष्टिने नंतर प्रोजेक्ट डिजीटली लाँच केले गेले, पण आता सर्वकाही सुरळित होण्याच्या मार्गावर आहे या आनंदाने ‘चांगली खेळलीस.


तू’ हे मराठी ब्रेकअप रॅप साँग हक्कांच्या माणसांच्या उपस्थितीत ऑफलाईन पध्दतीने लाँच करण्यात आलं आहे.



या गाण्यात प्रेक्षकांसाठी एक सुंदर, गोड सरप्राईज पण आहे आणि ते सरप्राईज म्हणजे अभिनेत्री सायली संजीव. सायली संजीव या गाण्यात 'सायली संजीव'च्याच भूमिकेत दिसणार आहे. आता गाण्यात सायलीची एन्ट्री नेमकी कशी होते हा एक ट्विस्ट आहे जो गाणं पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळेल.