कोणत्या दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या डेडिकेशननं दीपिकाचं महत्त्वं कमी केलं? Photo पाहून प्रेमात पडाल
Entertainment News : अभिनेत्रीची जिद्द पाहून सगळेच हैराण... एका चित्रपटासाठी तिनं इतकी मेहनत घेतली की...दीपिकावर मात करणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?
Entertainment News : भारतीय कलाजगतामध्ये फक्त हिंदी चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर विविधभाषी चित्रपटसृष्टींचाही समावेश होतो. परिणामी फक्त बॉलिवूडच नव्हे, तर इतर कलाविश्वातून पुढे येणाऱ्या कलाकारांनासुद्धा प्रेक्षकांची कमाल पसंती मिळते. प्रेक्षक पसंतीच्याच बळावर समोर येणाऱ्या या कलाकारांमध्ये एक नाव असंही आहे, ज्या अभिनेत्रीच्या कलेप्रती असणाऱ्या डेडिकेशनमुळं चक्क एका दिग्दर्शकानं दीपिका पदुकोण या आघाडीच्या नावालाही बगल दिली. ही अभिनेत्री कोण आहे माहितीये?
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारी आणि दमदार अभिनयामुळं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी ही अभिनेत्री आहे मालविका मोहनन. येत्या काळात ती प्रभाससोबत 'राजा साब' या चित्रपटातून झळकणार असून, चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चाहत्यांनी पुन्हा एकदा मालविका आणि लेडी सुपरस्टार नयनतारा यांच्या चेहऱ्यांमध्ये असणाऱ्या साधर्म्याविषयी बोलण्यास सुरुवात केली आहे.
भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेणारी अभिनेत्री...
भूमिकेसाठीचं आवश्यक संशोधन आणि लूकवर काम करणाऱ्या कलाकारांमध्ये मालविकाचं नाव घेतलं जातं. 'बियाँड द क्लाऊड्स' या चित्रपटातून अभिनेता ईशान खट्टरच्या ऑनस्क्रीन बहिणीच्या भूमिकेत झळकली होती, या भूमिकेसाठीही तिनं कमाल मेहनत घेतली होती. ही तिच भूमिका होती, ज्यासाठी मालविकानं अवघ्या 15 दिवसांमध्ये 8 किलो वजन कमी केलं होतं.
चित्रपटामध्ये मालविका साकारात असलेलं पात्र कारागृहात आहे असं एक दृश्य होतं. या दृश्याच्या चित्रीकरणासाठी तिनं आठवडाभर केस धुतले नव्हते, जेणेकरून तिचा लूक काहीसा झोपडपट्टी वस्तीमध्ये राहणाऱ्या एखाद्या मुलीसारखा दिसू शकेल. मालविकानं या चित्रपटासाठी इतकी प्रचंड मेहनत घेतली होती, की तिनं दिग्दर्श माजिद मजिदी यांच्या संपूर्ण कारकिर्दीसंदर्भातील लेख, कात्रणं वाचली होती. त्यांच्या दिग्दर्शन शैलीचा अंदाज घेतला होता.
हेसुद्धा वाचा : 'ही काय बाग आहे का' न विचारता VIDEO शूट करणाऱ्या चाहत्यावर विक्रांत मेसी संतापला आणि...
कलेप्रतीची ओढ आणि जिद्द सोबतच कमालीचं समर्पण पाहून मजिदी यांनी दीपिका, कंगना या त्या वेळच्या आघाडीच्या अभिनेत्रींना दूर सारत मालविकाला या भूमिकेसाठी निवडलं होतं. हे झालं एक उदाहरण.
'तंगलान' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानही मालविकानं प्रचंड सहनशीलतेनं काम केल्याचं पाहायला मिळालं चित्रीकरणादरम्यानच्या मेकअपमुळं बर्न मार्क्स आले तरीही तिनं माघार घेतली नाही. मालविका मोहननंच्या याच कामगिरीमुळं ती कायमच सर्व अभिनेत्रींच्या यादीत तिचं वेगळेपण अधिक प्रभावीपणे सिद्ध करताना दिसते.