Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. रणबीर आला तेव्हा त्याला चॉकलेट बॉय असं म्हटलं जातं होतं. त्याच्या चाहत्यांच्या यादीत सगळ्यात जास्त तरुणी आहेत. गेल्या काही दिवसांपासून रणबीर 'अ‍ॅनिमल' या चित्रपटामुळे चर्चेत होता. त्याचं लग्न झाल्यापासून आणि त्यातल्या त्यात राहाच्या जन्मानंतर रणबीर कुठेही जातो तरी तो राहाचं नाव काढत असतं. दरम्यान, सध्या रणबीरचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. या मुलाखतीत तो गर्लफ्रेंड्सविषयी बोलताना दिसला त्यामुळे तो फार चर्चेत आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणबीर कपूरच्या खासगी आयुष्याविषयी नेहमीच चर्चा सुरु राहिली आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर रणबीरचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडण्यात आलं. त्यात दीपिका पदुकोण, कतरिना कैफ यांची देखील नावं आहेत. दीपिकासोबत त्याचा ब्रेकअप झाल्यानंतर त्याला अनेकांनी 'धोखेबाज' हा टॅग देखील लावण्यात आला होता. आता सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. त्यात तो बोलताना दिसतोय की एका मुलीला डेट करत असताना दुसऱ्या मुलीला कसं डेट करु शकतात. 


तर त्याचा हा व्हिडीओ 'कॉफी विथ करण' मधील आहे. ज्यात तो इमरान खानसोबत दिसतोय. व्हिडीओत तो रणबीर कपूर करण जोहरला हे सांगताना दिसतोय की त्याच्या फोनमध्ये पाहणं एक मोठा टास्क आहे. यावर रणबीरनं त्याचं एक सिक्रेट सांगितलं की तो त्याच्या फोनमध्ये त्याच्या पुरुष मित्रांच्या नावानं दुसऱ्या मुलींची नावं सेव्ह करतो. 


त्याविषयी आणखी गोष्टी सांगत रणबीरनं आणखी एका गोष्टीचा खुलासा केला की तो त्याच्या फोनमध्ये मुलींची नावं 'बॅटरी लो' या नावानं सेव्ह करायचा. त्यामुळे जेव्हा तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत असायचा आणि जर तेव्हा दुसऱ्या मुलीचा फोन आला, तर फोनवर मुलीच्या नावाच्या जागी 'बॅटरी लो' फ्लॅश व्हायचं. करणनं विचारलं की त्याच्या कोणत्या गर्लफ्रेंडनं त्याच्याच या ट्रिकचा वापर केला आहे. त्यावर उत्तर देत रणबीरनं हो असं म्हटलं. 


हेही वाचा : स्पॉटबॉय, हेअर स्टायलिस्ट ते तब्बूच्या साड्यांना इस्त्री करण्यापर्यंत रोहित शेट्टीनं केली 'ही' कामं


रणबीर आणि आलिया या दोघांचं लग्न एप्रिल 2022 मध्ये झालं आणि 6 नोव्हेंबरला राहाचा जन्म झाला. राहाच्या जन्माच्या एका वर्षानंतर रणबीर आणि आलियानं राहाचा चेहरा दाखवण्याचा निर्णय घेतला.