मुंबई : आयुष्यात शाश्वत असं काहीच नाही, हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं असेल. बऱ्याचदा प्रत्यक्ष आयुष्यातही याची प्रचिती आली असेल. कारण, जीवनात जेव्हा आपण एखादी गोष्ट कायमस्वरुपी आहे अशा अविर्भावात जगू लागतो तेव्हाच आपल्याला एखादा धक्का बसतो. (once worked with amitabh bachchan Suchismita Routray now selling momos)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका तरुण कलाकार मैत्रिणीसोबतही असंच काहीसं घडलं. सुचिस्मिता राउत्रे (Suchismita Routray) असं तिचं नाव. 2015 मध्ये ती मुंबईत आली होती. जवळपास 6 वर्षांसाठी तिनं असिस्टंट कॅमेरा पर्सन म्हणून काम पाहिलं. पण, आता मात्र कटक येथे आईसोबत राहताना ती पूर्णपणे वेगळे दिवस पाहत आहे. 


कलाजगताचा झगमगाट तिच्यापासून कैक मैल दूर गेला आहे. लॉकडाऊनच्या आधी आपलं आयुष्य योग्य पद्धतीनं सुरु होत. मनाजोगं काम, बऱ्याच संधी तिला मिळत होत्या. पण, कोरोनाच्या संकटानं हे चित्र बदललं. 




अनेक मोठ्या निर्मिती संस्थांसाठी तिनं काम केलं. आज मात्र तिला कटकच्या रस्त्यांवर मोमोज विकावे लागत आहेत. दिवसाला ती कसेबसे 300-400 रुपये कमवत आहे. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या रेसिपी शेअर करतही ती अर्थार्जनाचा एक नवा मार्ग अवलंबताना दिसत आहे. 


सुचिस्मिता राउत्रे (Suchismita Routray)नं अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, वरुण धवन, सुशांत सिंह राजपूत यांसारख्या कलाकारांसोबत काम केलं आहे. असं असलं तरीही परिस्थिती बदलल्यामुळं तिला रस्त्यांवर उतरून मोमोज विकावे लागत आहेत. 




आज ती कलाजगतापासून दूर आहे. कोरोनाचं संकट आलं, त्यावेळी तिच्याकडे घरी जाण्यासाठी आणि खाण्यापिण्यासाठीचेही पैसे नव्हते. त्यावेळी सलमान आणि अमिताभ बच्चन या कलाकारांनी तिला मदत केली होती. त्यांच्याच मदतीमुळं ती ओडिशाला आपल्या घरी पोहोचू शकली.