नवी दिल्ली : सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेली अभिनेत्री सनी लियोनी आपल्या फॅन्ससाठी एक खास संधी घेऊन आली आहे.


काय आहे ती संधी ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनीने तिच्या फॅन्ससाठी एक चॅलेन्ज दिले आहे. त्यासाठी तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओच्या शेवटी तिने या चॅलेन्जबद्दल सांगितले. हे चॅलेन्ज पूर्ण केल्यास गिफ्ट म्हणून स्मार्टफोन मिळेल. त्याचबरोबर व्हिडिओ कॉल करण्याची संधी देखील मिळेल. 


 



काय आहे टास्क ?


या चॅलेन्जमध्ये लोकांना हे सांगायचे आहे की, ते आपले प्रेम कसे व्यक्त करतात. यासाठी हायपस्टार अॅपच्या माध्यमातून एक व्हिडिओ बनवून तो ट्विटर किंवा इंस्‍टाग्रामवर #SunnyLeoneChallenge हे हॅशटॅग वापरून अपलोड करावा लागेल. त्यापैकी विजेत्याची निवड सनी लियोनी करेल आणि त्यानंतर स्वतःहून व्हिडिओ कॉल करेल.