95th Academy Award 2023 : यंदाच्या वर्षीचं ऑस्कर आपल्या सगळ्यांसाठी खास आहे. भारतीय तर ऑस्कर 2023 साठी प्रचंड उत्सुक आहेत. चाहत्यांना अपेक्षा आहे की एस.एस. राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटासाठी तर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता अशी माहिती समोर येत आहे की 'नाटू नाटू' (Natu Natu) या गाण्यावर अभिनेता राम चरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआर (Jr NTR) नाही तर दुसरी व्यक्ती परर्फॉर्म करणार आहे. छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो 'झलक दिखलाजा 6' ची रनरअप आणि अमेरिकन डान्सर लॉरेन गॉटलिब (Lauren Gottlieb) 'नाटू नाटू' वर डान्स करणार आहे. याचा खुलासा स्वत: लॉरेन गॉटलिबनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉरेन गॉटलिबनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लॉरेननं लॉस एंजलिस येथे असलेल्या हॉलिवूड या लोकप्रिय असलेल्या साइनच्या समोर पोज देत हा फोटो काढला आहे. या फोटोत लॉरेननं लाल रंगाची ब्रालेट काळ्या रंगाचं जॅकेट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. हा फोटो शेअर करत लॉरेननं कॅप्शन दिलं की स्पेशल न्यूज! ऑस्करमध्ये मी नाटू नाटू या गाण्यावर पर्फॉर्म करणार आहे. मी खूप उत्साही आहे, कारण इतक्या मोठ्या स्टेजवर मला ही संधी मिळत आहे. मला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे! तिला या गाण्यावर डान्स करताना पाहण्यासाठी भारतीय प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. 



हेही वाचा : Priyanka Chopra च्या घरी पोहोचला राम चरण, ऑस्कर पार्टीतील फोटो Viral


लॉरेननं बॉलिवूडपासून भोजपूरी चित्रपटसृष्टीपर्यंत काम केलं आहे. लॉरेननं लोकप्रिय कोरिओग्राफर रेमो डिसुजा दिग्दर्शित ABCD या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. लॉरेनं ही स्टॉकलॅंडची रहिवासी आहे. लॉरेननं अभिनेत्री आणि डान्सर आहे. बॉलिवूडमध्ये तिचं नशिब आजमावण्यासाठी ती इथे आली होती. लॉरेननं भोजपुरी अभिनेता पवन सिंगच्या लोकप्रिय ठरलेल्या कमरिया या गाण्यातून भोजपुरी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. या गाण्यातील तिचा डान्स पासून अनेकांना आश्चर्य झाले होते. दरम्यान, आता आरआरआर विषयी बोलायचं झालं तर 95 व्या अकादमी अवॉर्ड्समध्ये नॉमिनेशन मिळाले आहे. ऑस्कर 12 मार्च रोजी पाहता येणार आहे. तर भारतात 13 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजता प्रदर्शित होणार आहे.