गटबाजीच्या वक्तव्यानंतर रहमान यांनी दिला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन
काय म्हटलंय दोन्ही ट्विटमध्ये?
मुंबई : काही दिवसांपूर्वी संगीतकार ए आर रहमान यांनी देखील बॉलिवूडवर आरोप केला होता की, बॉलिवूडमधील गँग मला काम करू देत नाही. मात्र या आरोपानंतर आता आणखी एक ट्विट केलं आहे. ए आर रहमान यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर दिग्दर्शक शेखर कपूरने त्यांना सपोर्ट करणार ट्विट केलं. मात्र आपल्या वक्तव्यानंतर रहमान यांनी वेगळंच ट्विट केलं आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये 'इनसाइडर आणि आऊटसायडर' अशी चर्चा रंगली आहे. याचसंदर्भातील रहमानचं पहिलं ट्विट होतं. पण आपल्या ट्विटवरून वाद वाढत असताना त्यांनी दुसरं ट्विट करून वादाला पूर्णविराम दिला आहे.
“गेलेला पैसा परत मिळू शकतो. गेलेलं फेमही परत मिळू शकतं. परंतु आपल्या आयुष्यातील वाया गेलेली वेळ ही पुन्हा मिळत नाही. शांतता. यातून आपण बाहेर पडू. आपल्याकडे करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत,” असं म्हणत ए.आर.रेहमान यांनी या वादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या ट्विटला रेहमान यांनी रिट्विट करत उत्तर दिलं आहे.
या अगोदर रहमानने आणखी एक ट्विट केलंय. त्यामध्ये त्याने म्हटलंय की,“मी चांगले चित्रपट कधीच नाकारत नाही. परंतु असा एक गट आहे जो काही गैरसमजांमुळे माझ्याविरोधात अफवा पसरवत आहे. मुकेश छाब्रा हे माझ्याकडे आले होते आणि मी दोन दिवसांमध्ये त्यांना गाणी तयार करून दिली,” असं ते म्हणाले होते.
“छाब्रा यांनी मला सांगितलं की अनेकांनी त्यांना माझ्याकडे जाऊ नका असं म्हटलं. तसंच माझ्याविरोधातही त्यांना निरनिराळ्या गोष्टी सांगितल्या,” असंही रेहमान यांनी यावर बोलताना सांगितलं.” त्यांच्या गोष्टी ऐकून मला समजलं की मला सध्या काम का मिळत नाहीये आणि चांगले चित्रपट माझ्याकडे का येत नाहीयेत,” असंही त्यांनी म्हटलं होतं. या ट्विटमुळे ट्विटरवर मोठी चर्चा रंगली होती.