सततची दारू, Sex आणि यामुळे ओढावलेलं आजारपण... प्रसिद्ध अभिनेत्याची ही काय अवस्था ?
कलाकारांचं आयुष्य पाहिल्यानंतर त्याचा कायमच हेवा वाटत राहतो. पण, मुद्दा असा की याच कलाकारांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी आणि आलेली वळणं समोर आली की आपल्याही पायाखालची जमीन सरकते. असाच खळबळजनक खुलासा एका अभिनेत्यानं केला होता. हा अभिनेता म्हणजे विल स्मिथ.
मुंबई : कलाकारांचं आयुष्य पाहिल्यानंतर त्याचा कायमच हेवा वाटत राहतो. पण, मुद्दा असा की याच कलाकारांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी आणि आलेली वळणं समोर आली की आपल्याही पायाखालची जमीन सरकते. असाच खळबळजनक खुलासा एका अभिनेत्यानं केला होता. हा अभिनेता म्हणजे विल स्मिथ.
खासगी आयुष्याबद्दल वक्तव्य करत असताना विलनं बरेच गौप्यस्फोट केले. जिथं सर्वांच्या भुवया उंचावल्या. कारणही तसंच होतं. काही दिवसांपूर्वीच विल स्मिथनं त्याच्या पत्नीची खिल्ली उडवणाऱ्या कलाकाराला ऑस्करच्या मंचावर कानशिलात लगावली होती.
मुद्दा असा, की ज्या जेडासाठी विलनं हे सर्व केलं, त्याच जेडासोबतच्या नात्यात त्याला दुराव्याचाही सामना करावा लागला होता.
विलनं एका मुलाखतीदरम्यान जेडासोबतचं आपलं नातं जगासमोर आणलं होतं. 90 च्या दशकात आपली ओळख झाली तेव्हा हे नातं पूर्णपणे शारीरिकच होतं, असं विल मुलाखतीत म्हणाला होता. सुरुवातीच्या चार महिन्यांत आम्ही एकतर दारू प्यायचो किंवा अनेकदा सेक्स करायचो.
मला वाटायचं की एकतर मी हिला आनंद देईन किंवा मग प्रयत्न करण्यातच माझा अंत होईल', असं विल म्हणाला होता.
मी इतक्या महिलांसोबत शरीरसंबंध ठेवले आहेत की, यासाठी मी Psychosomatic पणे व्यक्तही व्हायचो. यामुळं मला अनेकदा उलटीही होत होती, असं तो म्हणाला.
अनेक स्त्रियांशी होते संबंध
अभिनेत्याने आपल्या पुस्तकातही यासंबंधीचा खुलासा करत प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर आपले अनेक महिलांशी शारिरीक संबंध होते असं त्यानं सांगितलं. अती सेक्समुळं आपण आजारी पडल्याचंही त्यानं सांगितलं.