Oscars 2022 Nominations : भारतीय मनोरंजन क्षेत्रातून महत्त्वाची बातमी आहे. जगातील प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या ऑस्कर पुरस्कारांसाठी (Oscars 2022)  यंदाचं नामांकन जाहीर करण्यात आलं आहे. यंदा अनेक मोठे चित्रपट हा पुरस्कार पटकावण्याच्या शर्यतीत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय प्रेक्षकांनाही यंदाच्या ऑस्कर पुरस्काराकडून मोठ्या आशा आहेत. यावर्षी भारतातील काही चित्रपटांनीही ऑस्करच्या यादीत आपले स्थान निर्माण केलं होतं. पण यंदा ऑस्करसाठी भारताने निवडलेल्या 'जय भीम' आणि  'मारक्कर' अंतिम नामांकन यादीत स्थान मिळवू शकले नाहीत.


असं असलं तरी सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या श्रेणीत ‘रायटिंग विथ फायर’ने (Writing With Fire) आपलं स्थान निश्चित करुन सर्वांनाच चकित केलं आहे. रिंटू थॉमस आणि सु्ष्मित घोष दिग्दर्शित 'राइटिंग विथ फायर' हा माहितीपट दलित महिलांनी चालवलेल्या भारतातली एकमेव वृत्तपत्र 'खबर लहरिया'वर आधारित आहे. 


या माहितीपटात खबर लहरियाच्या निर्मितीची कहाणी सांगण्यात आली असून दलित महिलांवर भाष्य करण्यात आलं आहे. या माहितीपटाने आतापर्यंत विविध पुरस्कार मिळवले आहेत. 


'ऑस्कर' यादीत यांचा बोलबाला
यावर्षी ऑस्कर पुरस्कारासाठी निवडलेल्या अभिनेत्रींमध्ये जेसिका चेस्टेन, ऑलिव्हिया कोलमन, निकोल किडमन, पेनेलोप क्रूझ, क्रिस्टिन स्टीवर्ट यांच्या नावांचा समावेश आहे. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या यादीत स्टीव्हन स्पीलबर्ग, जेन कॅम्पियन, पॉल थॉमस अँडरसन या दिग्दर्शकांची नावे निवडण्यात आली आहेत. तर सर्वोत्कृष्ट चित्रपटात ड्युन, कोडा, डोंट लुक अप, द पॉवर ऑफ गॉड, वेस्ट साइड स्टोरी, नाईटमेअर अॅली, किंग रिचर्ड या चित्रपटांचा समावेश आहे.