Oscars controversies : अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर हे जगातील सर्वात मोठे चित्रपट पुरस्कार आहेत. यंदा या पुरस्कारांचे लॉस एंजेलिसमध्ये आयोजन करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा भारतीयांसाठी खूप खास असून भारताकडून ऑस्करसाठी चार नामाकंन गेली आहेत. यामध्ये नुकताच हाती आलेल्या निकालानुसार भारताला पहिला ऑस्कर "The Elephant Whispers" या शॉर्ट फिल्मने बेस्ट शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे. तर दुसरी आनंदाची बातमी म्हणजेच भारतीय चित्रपट RRR  मधील नाटू नाटू  या गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉंन्गचा पुरस्कार मिळाला आहे. पण तुम्हाला माहतीये का? की, ऑस्करमधील वाद हे देखील खूप चर्चेत आले होते. आज आम्ही तुम्हाला याच ५ वादांबद्दल सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा ऑस्कर अवॉर्डमधील वाददेखील चर्चेत राहिले आहेत. यामध्ये अकादमी पुरस्कारच्या मंचावर किस करणं तिथपासून कानशिलात लगावल्यापर्यंत बऱ्याच कॉन्ट्रोवर्सी झाल्या आहेत. 


विल स्मिथने क्रिस रॉकला सगळ्यांसमोर कानशिलात लगावली होती
2022 चा ऑस्कर पुरस्कारही अनेक वादात सापडला होता. स्टेजवर क्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जाडा पिंकेट स्मिथच्या टक्कल पडण्याची खिल्ली उडवली. यामुळे संतापलेल्या स्मिथने स्टेजवरच क्रिस रॉकला कानशिलात लगावली. यानंतर बराच वाद रंगला, यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. चूक लक्षात आल्यावर, विल स्मिथला ख्रिससोबत बोलायचं होतं, मात्र ख्रिसने नकार दिला. नंतर स्मिथने थप्पड मारल्याच्या घटनेबद्दल ख्रिस रॉकची माफी मागणारा व्हिडिओ शेअर केला होता.


अँजेलिनाचा कोणावर वाद होता
अँजेलिना जोलीला तिच्या 'गर्ल इंटरप्टेड' चित्रपटासाठी 2000 साली सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. ऑस्कर ट्रॉफी मिळाल्यानंतर अँजेलिना तिच्या भावाला किस करताना दिसली होती, ज्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. हा वाद वाढल्यावर अँजेलिनाचा भाऊ जेम्स याने स्पष्टीकरण दिलं होतं.
 
मार्लन ब्रांडोने नाकारला होता ऑस्कर
1973 मध्ये द 'गॉडफादर' या सिनेमासाठी मार्लन ब्रँडोला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. पण मार्लनने हा पुरस्कार स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यांच्या जागी नेटिव अमेरिकन एक्टिविस्ट सेचिन लिट्लफेदर या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते. यादरम्यान सेचिन यांनी सांगितलं  की, हॉलिवूडमध्ये नेटिव अमेरिकन लोकांची प्रतिमा दाखवण्यात आल्याने ते नाराज असल्याने त्यांनी हा पुरस्कार नाकारला होता. या प्रकरणावरून बराच वादही झाला होता.


एड्रियन ब्रूडीने ऑस्करच्या मंचावरहले बेरीला केलं होतं किस
2003 च्या अकादमी पुरस्कारमध्ये एड्रियन ब्रूडीला 'दि पियानिस्ट'साठी ऑस्कर अवॉर्डने सन्मानित केलं गेलं. स्टेजवर एड्रियनला ट्रॉफी देण्यासाठई हॅली बेरी आली होती. यादरम्यान एड्रियनने हॅली बेरीला स्टेजवर किस केलं. यावर बराच वादही झाला. यानंतर एड्रियनने स्पष्ट केलं की, हा सगळा आधीच केलेला प्लान होता.
 
'ला ला लँड'च्या चुकीमुळे ऑस्करच्या घोषणेवर वादाची ठिणगी पडली
2017 मध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात मोठी चूक झाली होती, ज्यावरून बराच वाद झाला होता. खरं तर, या सोहळ्यादरम्यान 'ला ला लँड' या चित्रपटाचे नाव चुकून सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी जाहीर करण्यात आलं.  मात्र, चूक लक्षात आल्यानंतर उपस्थितांच्या हातात चुकीचं नाव असलेला लिफाफा गेल्याची घोषणा मंचावरून करण्यात आली. 'मूनलाईट' या पुरस्काराची पात्र ठरली होती.