मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्माच्या 'पाताल लोक'ची जोरदार चर्चा होत आहे. या सिरीजबद्दल दिवसेंदिवस वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत. आता या वेब सिरीजवर जातीवादक टिप्पणी करण्यात येत आहे. निर्माता अनुष्का शर्माला एका वकिलांनी नोटीस पाठवली आहे. उत्तर प्रदेशातील भाजप आमदार नंदकिशोर गुर्जरने तक्रार दाखल केली आहे. त्यांचा फोटो सीरिजमध्ये परवानगी न घेता छापला त्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदारांचा असा आरोप आहे की,'पाताल लोक' सीरिजमध्ये एका आरोपीचा फोटो दाखवताना त्यांच्या फोटोचा वापर करण्यात आला. सीरिजमध्ये देखील गुर्जर समुदायाचे देखील अनेक कॅरेक्टर आहेत. 



भाजप आमदारांचा असा दावा आहे की, त्याचा आणि एका वरिष्ठ भाजप नेत्याचा फोचो मॉर्फ करू दाखवण्यात आला यामुळे सीरिज बॅन करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच कारवाईची देखील मागणी केली आहे. 



बालकृष्ण नावाच्या आरोपी प्रवृत्तीच्या नेत्यासोबत रस्त्याच्या उद्घाटनात भाजपच्या या दोन व्यक्तींचा फोटो मॉर्फ करून लावण्यात आला होता. यामुळे पक्षाची प्रतिमा खराब झाली आहे. यामुळे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.