नवी दिल्ली :  सुप्रीम कोर्टाकडून 'पद्मावत'ला चित्रपटाला देशभर रिलीज करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. तर दुसरीकडे रायपूरमधील राजपूत क्षत्रिय महासभाचे प्रदेश अध्यक्ष विक्रमादित्य सिंह जुदेव यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय मानणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 
 
 ते म्हणाले, 'पद्मावत' चित्रपटाला आमचा विरोध कायम असणार आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश आल्यानंतरही जुदेव यांनी चित्रपट प्रदर्शीत झाल्यावर परिणामांना सामोरे जाण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका टाकणार आहोत. 
 
 तसेच आज (१८ जानेवारी) सायंकाळी छत्तीसगडच्या क्षत्रिय समाजाच्या संघटनेसोबत बैठक करून चित्रपटाचा विरोध करण्याची रणनिती आखणार आहे. 


 काय म्हणाले कोर्ट?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘जर राज्य या सिनेमावर प्रतिबंध लावत आहेत तर ही भारतीय व्यवस्थेवर हल्ला आहे. हा गंभीर विषय आहे. जर कुणाला याबाबत समस्या असेल तर ते कायद्याची मदत घेऊ शकतात. राज्य सिनेमाच्या कथेला हात लावू शकत नाहीत’. आणि चित्रपटाला सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी राज्य सरकारांची आहे आणि ती त्यांनी पार पाडायला हवी असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. 


२५ तारखेला होणार रिलीज


‘पद्मावत’ सिनेमाचे निर्माते काही राज्यांमध्ये या सिनेमावर घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेले होते. सेन्सॉर बोर्ड द्वारे देण्यात आलेल्या तारखेनुसार हा सिनेमा २५ जानेवारीला रिलीज होणार आहे. हा सिनेमा हिंदीसहीत तमिळ आणि तेलगु भाषांमध्येही रिलीज केला जाणार आहे. ‘पद्मावत’ आयमॅक्स थ्रीडीमध्ये रिलीज होणारा पहिला भारतीय सिनेमा आहे.


चार मोठ्या राज्यात बंदी


सुरूवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला पद्मावत हा चित्रपटाला सेंसर बोर्डातही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पद्मावत २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि मध्य प्रदेश या चार राज्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार नव्हते.