मुंबई : 'पॅडमॅन' हा अक्षय कुमारचा आगामी चित्रपट त्याच्या पहिल्या झलक पासूनच चर्चेचा विषय ठरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच या चित्रपटाचे पहिले गाणेदेखील रसिकांच्या भेटीला आले आहे. अक्षयचा या चित्रपटातील अंदाज सार्‍यांचेच लक्ष वेधून घेत आहे.  


पॅडमॅन चं टायटल सॉन्ग 


'टॉयलेट एक प्रेम कथा' नंतर 'पॅडमॅन' कडे सार्‍यांचे लक्ष लागले  आहे. पॅडमॅनचं टायटल सॉंग गायक मीका सिंग यांनी गायले आहे तर अमित त्रिवेदीने याला संगीत दिले आहे. अल्पावधीतच 'पॅडमॅन'चे बोल  रसिकांच्या तोंडात बसले आहेत. 


 



 


अक्षयच्या सोबतीला कलाकार कोण ? 


पॅडमॅन ही सत्यकथेवर आधारित चित्रपट आहे. अक्षय कुमारसोबत या चित्रपटामध्ये सोनम कपूर महत्त्वाची भूमिका साकारत आहे. सोबतच राधिका आपटे अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.  


आर. बाल्की दिगदर्शित 'पॅडमॅन' येत्या २६ जानेवारीला  रसिकांच्या भेटीला येणार आहे.  अक्षयची पत्नी डिंपल कपाडिया या चित्रपटाच्या निर्मितीची बाजू सांभाळत आहे. निर्मितीच्या क्षेत्रात या चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण होणार आहे.