मुंबई : संजय लीला भन्साली यांच्या बहुप्रतिक्षित पद्मावती सिनेमाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हं नाही आहेत. राजस्थानमध्ये पद्मावती सिनेमावर अघोषित बंदी घालण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानमधील कोणताही वितरक सिनेमा दाखवण्यासाठी तयार नाही. अशातच जयपूरच्या राजघराण्यानेही पद्मावती सिनेमाला विरोध केला आहे. पूर्व राजघराण्याच्या राजकुमारी आणि आमदार दीया कुमारी यांनी पद्मावती या सिनेमावर संताप व्यक्त केला आहे.


या सिनेमाच्या माध्यमातून राजस्थानच्या इतिहासाशी केलेली छेडछाड कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. सिनेमातील घुमर नृत्यावरही राजघराण्याने आक्षेप घेतला आहे.