`पद्मावती` सिनेमाला समर्थन देत बॉलिवूड करणार `ब्लॅकआऊट`
संजय लीला भन्साळी यांच्या `पद्मावती` सिनेमाच्या समर्थनार्थ बॉलिवूड उतरल्याचं पहायला मिळत आहे.
नवी दिल्ली : संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती' सिनेमाला देशभरात विरोधाचा सामना करावा लागत आहे. मात्र, या सिनेमाच्या समर्थनार्थ बॉलिवूड उतरल्याचं पहायला मिळत आहे.
आयएफटीडीएने दिलं समर्थन
राजपूत संघटनांकडून 'पद्मावती' सिनेमाला विरोध होत असताना आता बॉलिवूडने सिनेमाचं समर्थन करण्याचं ठरवलं आहे. इंडियन फिल्म्स अॅण्ड टीव्ही डिरेक्टर्स असोसिएशन (आयएफटीडीए) ने आणि मालिका विश्वातील इतर २० संघटनांनी या सिनेमाला पाठिंबा दिला आहे.
होणार 'ब्लॅकआऊट'
न्यूज एजन्सी आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, आयएफटीडीएने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी पंधरा मिनिटांसाठी 'ब्लॅकआऊट' करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात कुठल्याचं प्रकारचं चित्रीकरण करण्यात येणार नाहीये.
सिनेनिर्माते अशोक पंडीत यांनी म्हटलं की, 'पद्मावती' सिनेमा आणि एसएलबी (संजय लीला भन्साळी) यांना आमचं समर्थन आहे.
सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर यांची मुख्य भुमिका असलेला 'पद्मावती' सिनेमा १ डिसेंबर रोजी रिलीज होणार होता. मात्र, सिनेमाला होणारा विरोध पाहता सिनेमाचं प्रदर्शन पूढे ढकलण्यात आलं आहे.