नवी दिल्ली : 'पद्मावती' सिनेमाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. हा सिनेमा १ डिसेंबरला रिलीज होणार होता. पण खूप वाद विवादानंतर याची रिलीज रोखण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्ड (सीबीएफसी) ने आतापर्यंत पद्मावतीच्या रिलीजला प्रमाणित केले नाही. 
 
 सरकारने सोमवारी यासंबंधी माहिती दिली. सूचना आणि प्रसारण राज्य मंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड (सेवानिवृत्त) यांनी सोमवारी राज्यसभेत यासंबधी सांगितले.  पद्मावतीचे ३ डी वर्जन संबंधी प्रमाणपत्र अर्ज २८ नोव्हेंबर २०१७ ला सीबीएफसीसमोर सादर केली आहे. 
 
फिल्म चलचित्र अधिनियम १९५२, चलचित्र (प्रमाणन) नियमावली १९८३ अतंर्गत नियमावलीनुसार प्रमाणन प्रक्रीयेतून हा सिनेमा जाईल. चलचित्र नियमावली १९८३ च्या नियम ४१ नुसार प्रमाणन प्रक्रियेसाठी ६८ दिवसांची सीमा दिली गेली आहे. जर सिनेमातील विषयामध्ये विशेषतज्ञांचे मत अपेक्षित असेल तर सीबीएफसीचे अध्यक्ष अधिक वेळ घेण्याचा निर्णय घेतील, असेही राठोड यांनी सांगितले.


काय आहे प्रकरण ?


राणी पद्मावती आणि अलाऊद्दीन खिलजी यांच्या आयुष्यावर बेतलेला हा सिनेमा आहे. पद्मावती आणि खिलजीवर काही दृश्य जयपूरमधील एका सेटवर चित्रित करण्यात येत होती. मात्र याचवेळी कर्णी सेनेच्या कार्यकर्त्यांनी तुफान हल्ला चढवत संजय लीला भन्साळींवर हल्लाबोल केला. यात भन्साळी बालबाल बचावलेत. राणी पद्मावतीच्या जीवनावर असलेल्या या सिनेमात भन्साळी इतिहासाची छेडछाड करत वेगळीच कहानी पडद्यावर मांडत असल्याचा आरोप राजपूत समाजाने केलाय. 


सुरुवातीला याबाबत भन्साळींना इशारेही देण्यात आले होते. मात्र भन्साळींनी त्याकडे फारसं गांभीर्याने पाहिलं नव्हतं. कदाचीत बाजीराव मस्तानीच्या वेळी जसा वाद सुरू झाला आणि जसा संपला त्याचीच पुनरावृत्ती इथे होईल असा भन्साळींचा अंदाज होता. मात्र राजपूत समाजाच्या रोषापुढे भन्साळींवर भलतंच संकट ओढवलं. 


भन्साळींवर सेटवर थेट हल्ला करण्यात आला. राणी पद्मावती चित्तोडची एक स्वाभिमानी राणी होती. सौदर्याची खाण असलेल्या पद्मावतीच्या शौर्याची आणि बलिदानाची कथा इतिहासात अमर आहे. मात्र भन्साळी सिनेमातून काही वेगळीच कथा मांडत असल्याचा आरोप कर्नी सेनेने केलाय 


पद्मावती चित्रपटामध्ये शाहीद कपूर, रणवीर सिंग सह  अभिनेत्री दीपिका पादुकोण प्रमुख भूमिकेत झळकत आहे.