Pakeezah: सिनेमातील एका गाण्यासाठी का लपवला अभिनेत्रीचा चेहरा, Meena Kumariच्या जागी दुसरी कोणती अभिनेत्री होती का?
Pakeezah Movie Unknown Facts: `पाकीजा` सिनेमा... ज्याचा काल उल्लेख होत होता आणि आजही केला जात आहे. `पाकीजा` (Pakeezah) सिनेमाशी संबंधित अनेक मनोरंजक किस्से आहेत, त्यापैकी एक चित्रपटातील चलो दिलदार चलो...चांद के पार चलो या गाण्याशी संबंधित आहे.
Pakeezah Movie Songs: हिंदी सिनेमासृष्टीतील लोकप्रिय सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर त्यात 'पाकीजा' याचे नाव नक्कीच येईल. राज कुमार आणि मीना कुमारी यांचा असा सिनेमा, ज्याचा उल्लेख जोपर्यंत हिंदी चित्रपटसृष्टी अस्तित्वात आहे तोपर्यंत होत राहील. सिनेमा आणि सिनेमाची कथा, त्यातील कलाकार प्रत्येक बाबतीत कसोटीवर उतरतात. पाकीझा गाणीही खूप लोकप्रिय झाली. ठाड़े रहियो ओ बांके..., चलते-चलते यूं ही कोई...चाहे कोई भी.. कोणतेही गाणे ऐका आणि पाहा. एकापेक्षा एक अशी गाणी आहेत. पण या चित्रपटात एक गाणे असे देखील आहे जे सुंदर आहे. पण या गाण्याच्या चित्रिकरणाबाबत एक शंका निर्माण होते. Chalo Dildar Chalo... या गाण्याबद्दल बोलत आहोत.
संपूर्ण गाण्यात अभिनेत्रीचा चेहरा दाखवला गेलाच नाही!
चलो दिलदार चलो, चांद के पार चलो... या संपूर्ण गाण्यात अभिनेत्रीचा चेहरा दिसत नव्हता, हे गाणे आपण सर्वांनी अनेकदा ऐकले असेल. युट्युबवर अनेकदा पाहिलं असेल. या गाण्यात काही विशेष लक्षात आले का? म्हणजे या गाण्यात अभिनेत्रीचा चेहरा कुठेच दिसत नाही. हे महाकाव्य गीत मीना कुमारी आणि राज कुमार यांच्यावर चित्रित करण्यात आले होते पण स्टुडिओमध्ये चित्रित झालेल्या या गाण्यात अभिनेत्रीची झलक क्षणभरही दिसत नाही. संपूर्ण गाण्यात राज कुमार दिसत आहेत. पण मीना कुमारीचा चेहरा दिसत नाही. अशा स्थितीत या गाण्यात मीना कुमारी खरोखरच होती का, की तिच्या जागी आणखी एखाद्या अभिनेत्रीसोबत हे गाणे चित्रित करण्यात आले होते का, अशी शंका येते.
चलो दिलदार चलो...चांद के पार चलो ...
हे गाणे पद्मा खन्ना यांच्यासोबत चित्रीत करण्यात आले होते का?, मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, हे गाणे पद्मा खन्ना यांच्यासोबत चित्रित करण्यात आले आहे. कारण ज्यावेळी हे गाणे शूट होणार होते, त्या वेळी मीना कुमारी यांची तब्येत बिघडली होती. ती शूट करु शकत नव्हती, अशा स्थितीत ती होती. त्यामुळे कॅमेऱ्यात चेहरा न घेता हे गाणे अशा प्रकारे चित्रित करण्यात आले.