माहिरा खानचा डब्समॅश व्हिडिओ व्हायरल...
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असते.
मुंबई : पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असते. रईस सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणाऱ्या या अभिनेत्रीचे पाकिस्ताना व्यतिरिक्त भारतातही अनेक चाहते आहे. काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरसोबत काही फोटोज व्हायरल झाल्याने ती चर्चेत आली होती. आता माहिराने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला त्यात राज कपूर आणि नरगिसचे गाणे 'जहा मैं जाती हूं वही चले आते हो' वर तिने डब्समॅश केला. तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पहा व्हिडिओ...
माहिरा या व्हिडिओत अत्यंत क्यूट दिसत आहे. तिच्या या व्हिडिओचे ३ लाखांहुन अधिक चाहते आहेत. याबरोबरच तिच्या या व्हिडिओवर अनेक भारतीय चाहत्यांनीही प्रतिक्रीया दिल्या आहेत.
रणबीरसोबतचे फोटोज व्हायरल
रणबीर कपूरसोबत स्मोक करतानाचे फोटोज व्हायरल झाल्यानंतर त्या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. मात्र दोघांनीही त्या अफवा असल्याचे म्हटले होते. यावर रणबीर म्हणाला होता की, मी काही महिन्यांपासून माहिराला ओळखतो. माहिरा एक खूप चांगली व्यक्ती असून अत्यंत प्रतिभावान आहे. त्यामुळे मी तिचा आदर करतो. त्यामुळे तिच्याबद्दल असे बोलणे आणि तिला जज करणे चुकीचे ठरेल.
चाहत्यांची मागितली माफी
माहिराने या व्हायरल झालेल्या फोटोजबद्दल आपल्या चाहत्यांची माफी मागितली होती. माहिरा पाकिस्तानी सिनेमा आणि टी.व्ही. वरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.