मुंबई : अभिनेत्री, मॉडेल आणि अॅक्टिव्हिस्ट मरियम नफीसनं अल्पावधीतच पाकिस्तानी इंडस्ट्रीला वेड लावलं आहे. टीव्हीवर सहाय्यक भूमिका करून त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे. मरियमनं 'डेर-ए-दिल' मधून अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. केवळ सात वर्षांच्या कारकिर्दीत मरियम नफीसनं उंची गाठली आहे. मरियम सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या पतीचं नाव अमान अहमद असून तो फिल्ममेकर आणि व्हिज्युअल आर्टिस्ट आहे. अनेकदा अमनसोबतचे हे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.


आणखी वाचा : हिंदी सिनेमांच्या अपयशामुळे ढासळत आहे देशाची अर्थव्यवस्था? रकुल प्रीत सिंगच्या वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मरियमचे करिअरचे शेवटचे सात वर्ष हे सोपे नव्हते. 2020 मध्ये मरियमनं हरॅस्टमेंटचा गुन्हा दाखल केला होता. सोशल मीडियावर मरियमनेही या घटनेची संपूर्ण माहिती दिली होती. एक व्यक्ती तिला काही चुकीच्या गोष्टी करण्याबद्दल बोलली होती. त्याचा स्क्रीनशॉट मरियमनं सोशल मीडियावर शेअर केला. या व्यक्तीचं नावं दानिश मलिक असे असल्याचे त्यानं सांगितलं. दानिश म्हणाला की, 'मी तुला ओळखत नाही. मला एवढंच माहीती आहे की तू एक अभिनेत्री आहेस. मला तुझ्यासोबत काही तास घालवायचे आहेत. तू मला तुझ्या मॅनेजरचा नंबर दिला तर बर होईल. मी त्याच्याशी बोलेन आणि मी तुझी किंमत पण ठरवेण. जागे विषयीही मी त्याच्याशी बोलेन. मी तुला काही तासांसाठी अडीच ते तीन लाख रुपये द्यायला तयार आहे.'


बातमीची लिंक : स्पर्धकाला एक चूक ठरली महागात, नाही तर जिंकला असता 7.5 कोटी; तुम्ही देऊ शकता या प्रश्नाचं उत्तर?



मरियमनं या व्यक्तीला सडेतोड उत्तर देत पोस्ट शेअर केली. ही पोस्ट शेअर करत मरियम म्हणाली, 'मी एक अभिनेत्री आहे, वेश्या नाही. अशा प्रस्तावांना मी कंटाळले आहे. मी अशा गोष्टी थांबवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे, पण आता मी काय करू. मी त्यांना कसं थांबवू? या गोष्टी माझ्या मानसिक आरोग्याला त्रास देत आहेत. मी खूप अस्वस्थ आहे. हा माझा व्यवसाय आहे असे अनेकांना वाटते. मी विक्रीसाठी नाही.'


मरियमचे इन्स्टाग्रामवर 920 हजार फॉलोअर्स आहेत. मरियम लवकरच पाकिस्तानी 'खतरों के खिलाडी' म्हणजेच 'द अल्टीमेट मुकाब'मध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे. हा पाकिस्तानचा स्टंटवर आधारित शो आहे.