Another Actress Left Industry: पाकिस्तानी अभिनेत्री जरनिश खाननं तिच्या करिअरची सुरुवात ही 2013 मध्ये केली होती. तिनं तिच्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं. पण आता 9 वर्षांनंतर तिनं अभिनय क्षेत्रातून काढता पाय घेतला आहे. जरनिश उमराहवर गेली होती जिथे तिनं शोबिज सोडण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत तिनं इंडस्ट्री सोडण्या मागचं कारण देखील सांगितलं. जरनिशनं अू हिजाब परिधान करणं सुरु केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जरनिशनं यूट्यूब चॅनल अनफोल्ड विद एबीला दिलेल्या मुलाखतीत इंडस्ट्री सोडण्यामागचं कारण सांगितलं. त्यांनी सांगितलं की मी उमराहवर गेले होते. जिथे मी लोकांना रडताना पाहिलं आहे. ती प्रार्थना करत होती तेव्हा तिनं तिथे काही लोकांना रडताना पाहिलं. ते देखील तिथे प्रार्थना करायला आले होते आणि मला लाज वाटू लागली होती. 


याविषयी पुढे सांगत जरनिशनं म्हणाली की जेव्हा मी उमराहवर गेली होती तेव्हा मी फक्त लोकांना पाहक होते. ते रडत होते आणि प्रार्थना करत होते. त्यांना पाहून मला खूप लाज वाटू लागली होती. मला वाटलं की तिथे राहण्यासाठी मी पात्र नाही. मी अल्लाहच्या घरी राहण्यासाठी पात्र नाही. त्यांच्याश कसं बोलेन. त्यानंतर जेव्हा मी घर आली तेव्हा मला झोप येत नव्हती. माझ्या स्वप्नात हजरत मोहम्मद आले होते. त्यांनी त्यात सांगितलं की तू अल्लाहच्या घरी आली आहेस, रडून माफी मागितली नाहीस. अल्लाह सगळ्यांना माफ करतो. रडून माफी मागं, त्यानंतर मी उठले णि वडिलांकडे जाऊन मी 2-3 तास रडत बसले. 


हेही वाचा : दोन्ही पत्नींनी ठेवला करवा चौथचा उपवास; पण 'या' कारणाने ट्रोल झाला अरमान मलिक


जरनिशनं पुढे सांगितलं की एका क्षणात मला सगळं काही सोडण्याची इच्छा झाली होती. मी माझं इन्स्टाग्राम ओपन केलं आणि फोटो - रिल्स पाहिले. जे पाहून मला लाज वाटली. मला वाटलं की मेल्यानंतर मी माझ्या अमालकडे पाहिले की माझ्याकडे काय आहे? त्यानंतर मी चित्रपटसृष्टी किंवा अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला आणि हिजाब परिधान करणं सुरु केलं. जरनिश सगळ्यात शेवटी इश्क समझ या मालिकेत दिसली होती. तिनं इन्स्टाग्रामवरून सगळे फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले आहेत.