Pakistani actress Zoya Nasir : अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्री चाहत्यांना त्यांच्या वेग-वेगळ्या लूकमधून फॅशन गोल्स देत असतात. काही वेळा चाहत्यांना अभिनेत्रींचे फोटो प्रचंड आवडतात, पण अनेकदा त्यांना ट्रोलींगचा सामना करावा लागतो. आता देखील एका ग्लॅमरस अभिनेत्रीने लाल साडीमधील फोटो इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले. (zoya nasir instagram)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्रीने लाल साडी, बॅकलेस ब्लाऊज मधील फोटो शेअर केला आहे. पण असे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणं अभिनेत्रीला महागात पडलं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून पाकिस्तानी अभिनेत्री झोया नासिर (Zoya Nasir) आहे. सध्या झोयाचे नवीन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 



फोटो पोस्ट करच तिने कॅप्शनमध्ये 'हा मी कॅमेऱ्यासाठी पोज देत आहे की पोज देण्याचा प्रयत्न करत आहे...' असं लिहिलं आहे. पण झोयाच्या बॅकलेस लूकमुळे पाकिस्तानचं तापमान तापलं आहे. तिच्या फोटोवर अनेक युजरने कमेंट केल्या आहेत. (zoya nasir serials)



झोयाच्या फोटोवर कमेंट करत एक युजर म्हणाला, 'किती वाईट कंबर आहे..' तर अन्य एका युजरने कमेंट करत अभिनेत्रीला तिच्या धर्माची आठवण करुन दिली. तो कमेंटमध्ये म्हणाला, 'सला सगळे तयार व्हा, तिला आठवण करून द्या की ती मुस्लीम आहे...' असे अनेक धक्कादायक कमेंट अभिनेत्रीच्या फोटोंवर येत आहेत. (zoya nasir husband)


झोयाच्या मालिका
झोया नसीरने  करिअरची (zoya nasir serials) सुरुवात 'हनिया' टीव्ही मालिकेतून केली होती. फरहान सईद स्टारर 'मेरे हमसफर' मधील भूमिकेसाठीही ती ओळखली जाते. झोया प्रसिद्ध पाकिस्तानी लेखक नासिर अदीब यांची मुलगी आहे. शिवाय झोया  'द लिजेंड ऑफ मौला जट' या तिच्या आगामी वेब सीरिजमुळे देखील चर्चेत आहे. (zoya nasir first husband)