मुंबई : बॉलिवूड कलाकार नेहमीच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चात असतात. शिवाय चाहते देखील आपल्या आवडत्या कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी जाणून घेण्यासाठी कायम उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तमन्ना भाटीया पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकशी लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. या चर्चांना उधाण आलं होतं ते फक्त एका फोटोमुळे. तो फोटो आता पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो फोटो एका एका ज्वेलरीच्या दुकानातील होता. त्यांचा हा फोटो पाहून ते दोघं लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आता खुद्द तमन्नाने त्या फोटोमागील अफवांवर स्पष्टिकरण दिलं आहे. 'सर्वात आधी माझं नाव एका अभिनेत्यासोबत जोडण्यात आले, नंतर एका क्रिकेटरसोबत आता डॉक्टरसोबत. हे सर्व ऐकल्यानंतर एक पती खरेदी करू की काय असं मला वाटू लागलं आहे.' असं ती म्हणाली. 


२०१७ मध्ये दुबईमधील एका इवेंटसाठी तमन्ना आणि अब्दुल रज्जाक यांना पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. त्यावेळी काढलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.