मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रेरणा या भूमिकेतून घरा-घरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजेच श्वेता तिवारी. श्वेताची मुलगी पलक तिवारी आजकाल सोशल मीडियावर चर्चेत असते.  इंडस्ट्रीत पाऊल ठेवताच तिने सर्वांवर आपली जादू चालवली आहे. ती केवळ तिच्या स्टाईल आणि ग्लॅमरने चर्चेत नसते तर तिच्या गाण्याच्या व्हिडिओमुळेही खूप चर्चेत आली होती. आता तिचा एक नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती अभिनेता वरुण धवनसोबत दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच पलक तिवारीने बिजली या गाण्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं, त्यानंतर लोक तिला बिजली गर्ल या नावाने हाक मारू लागले. आता व्हायरल होत असलेल्या तिच्या एका व्हिडिओमध्ये ती वरुण धवनसोबत दिसत आहे. पलक आणि वरुणचा हा डान्स व्हिडीओ एका सेटवरील असल्याचं दिसतंय, हे पाहता दोघेही लवकरच एका गाण्यात किंवा चित्रपटात एकत्र दिसणार असल्याची अटकळ बांधली जात आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडिओमध्ये लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये पलक तिवारी कमालीची ग्लॅमरस दिसत आहे. त्याचबरोबर, वरूण धवन देखील तिच्यासोबत कॅज्युअल जॅकेट आणि जीन्समध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये पलक तिवारी आणि वरुण धवन गाण्याच्या तालावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत.  वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर वरुण धवन 'भेडिया', 'जुग जुग जिओ' सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर पलक तिवारी 'रोझी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.