मुंबई : अर्जून कपूर स्टाटर फिल्म 'पानिपत'चा पहिला विकेंड हा अतिशय  कमी कमाईचा ठरला आहे. सिनेमाच्या पहिल्या फर्स्ट वीकेंडवर जवळपास 17.50 करोड रुपयाची कमाई केली आहे. ओपनिंग डेची तुलनात शनिवार आणि रविवार कमाई वाढली असली तरीही ती चांगली वाढत नसल्याच समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

BoxOfficeIndia.com ने दिलेल्या रिपोर्टनुसार शुक्रवारी ओपनिंग डे च्या दिवशी जवळपास 4 करोड रुपयांची कमाई केली आहे. शनिवारी जवळपास 6 करोड रुपयांची आणि रविवारी जवळपास 7.50 करोड रुपयांची कमाई केली आहे. 


पती, पत्नी और वो आणि पानिपत हे  दोन चित्रपट एकत्र रूपेरी पडद्यावर दाखल झाले तर चात्यांसाठी कोणाता चित्रपट पाहायला जावा असा प्रश्न असतो. तर या शुक्रवारी चित्रपट प्रेमींनी अभिनेता कार्तिक आर्यन स्टारर 'पती पत्नी और वो' चित्रपटाला कौल दिल्याचं दिसून येत आहे. रूपेरी पडद्यावर दाखल होताच 'पती पत्नी और वो' चित्रपटाने पहिल्या दिवशी ९ कोटींपर्यंत मजल मारली आहे. तर ऐतिहासिक कथेच्या जोरावर साकारण्यात आलेल्या 'पनिपत'ने ४ कोटी रूपयांचा गल्ला जमा केला. 


एकंदर पाहता पहिल्या दिवशी 'पती पत्नी और वो' चित्रपटाने बाजी मारली आहे. तर आता विकएण्डला कोणत्या चित्रपटाप्रती चाहते आपले प्रेम व्यक्त करतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.


Boxofficeindia.com च्या रिपोर्टनुसार रविवारी 13.5 ते 14 करोड रुपयांची कमाई केली आहे. सिनेमाने शपक्रवारी 8.50 करोड रुपयांची शानदार ओपनिंग करत शनिवारी 11.50 करोड रुपयांचा बिझनेस केला आहे. अशा प्रकारे या सिनेमाने आतापर्यंत 34 करोड रुपयांची कमाई केली आहे. रविवारी या कमाईत 20 टक्के वाढ झाली असून सोमवारी चांगली कमाई होईल अशी अपेक्षा आहे.