पंकजा मुंडेंना गटारीच्या दिवशी एका कार्यकर्त्याकडून असा `धोका`
झी मराठी वाहिनीवरील `किचन कल्लाकार` हा नवाकोरा शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
मुंबई : झी मराठी वाहिनीवरील 'किचन कल्लाकार' हा नवाकोरा शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता संकर्षण कऱ्हाडे करतो. यामध्ये कलाकार विविध पदार्थ बनवताना दिसतात. त्यामुळे किचनवर कल्ला तर होतोच मात्र यामुळे त्याचं स्वयंपाक स्कील देखील सर्वांना पाहयला मिळतं. पण यावेळी या कार्यक्रमात कलाकारांनी नव्हे तर राजकिय नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी शोमध्ये पंकजा मुंडे, रोहित पवार, प्रणिती शिंदे या राजकिय नेत्यांनी हजेरी लावली.
यावेळी पंकजा ताईंनी एक किस्सा प्रेक्षकांसोबत शेअर केला. यावेळी त्या म्हणाल्या ''आधी मी पक्की मांसाहारी होते. पण काहि वर्षापूर्वी मी पुर्णपणे व्हेजिटेरिअन झाले. श्रावण आम्ही पुर्णपणे पाळायचो. आमच्याकडे कोणीाच श्रावणामध्ये नॉनव्हेज खायचे नाही.
गटारी अमवास्येला नॉनव्हेज खायचा शळेवटचा दिवस असतो. आणि मी दौऱ्यावरुन ११- ११.३० ला घरी पोहचले. आणि त्याच्या आधी मला माझ्या कार्यकर्त्याचा फोन आला होता. त्याने नविन हॉटेल सुरु केलं होतं. तो म्हणाला ''मी तुम्हाला रस्सा पाठवतो मस्त तुमची गटारी आहे''. आणि मी घरी पोहचले अंघोळ वैगरे केली. ११.४५ वाजले होते श्रावण सुरु व्हायला १५ मिनीटचं होती. त्यामुळे पटापट जेवायला बसले.
रस्याचा टोप उघडला बघतेय ढवळतेय-ढवळतेय पण मटनाचा पिसच मिळत नव्हता त्यानंतर मी त्याला फोन केला आणि विचारल नुसता रस्साच पाठवला आहेस. मटन नाहीये. यावर तो म्हणाला '' मी तु्म्हाला म्हटलं ना फक्त रस्साच पाठवतोय''. त्याचबरोबर यावेळी पंकजा ताई म्हणाल्या मी त्याला महिनाभर शिव्या दिल्या मला मटना शिवायचा रस्सा खायला दिला. हा किस्सा माझ्या कायम लक्षात रहाण्यासारखा आहे.
किचन कल्लाकारच्या सेटवर मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार हजेरी लावतात. या शोच्या परिक्षकाच्या भूमिकेत प्रशांत दामले काम पाहत आहेत. तर हा शो होस्ट करण्याची जबाबदारी संकर्षण पार पाडत आहे. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.