बूट लपवल्याबद्दल निककडून परिणीतीला `हे` गिफ्ट
परिणीतीने प्रियांकाच्या लग्नावेळी झालेल्या या बूट लपवण्याच्या प्रथेवेळची एक आठवण सांगितली.
मुंबई : गेल्या वर्षी बॉलिवूड देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा मोस्ट गॅमरस लग्नसोहळा पार पडला. प्रियांकाची बहिण अणि अभिनेत्री परिणीती चोप्रा या लग्नानंतर सतत चर्चेत होती. ती चर्चा होती लग्नातील बूट लपवण्याच्या प्रथेची...निक जोनासचे बूट लपवल्यावर परिणीतीला मिळालेल्या गिफ्टची मोठी चर्चा होती. परिणीतीने निक-प्रियांकाच्या लग्नानंतर पहिल्यांदाच अभिनेत्री नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये बूट लपवण्याबाबतचा एक किस्सा शेअर केला आहे.
नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये परिणीतीने गिफ्ट्सची मोठी लिस्टच सांगितली. बूट लपवण्याच्या प्रथेदरम्यान निकने डॉलर आणि रुपयांमध्ये खूप पैसे दिल्याचं परिणीतीने सांगितलं. याशिवाय परिणीतीला या बूट लपवण्याच्या प्रथेसाठी हिऱ्याची अंगठी आणि बॅग्ज मिळाल्याचंही तिने सांगितलं. परिणीतीने निकचं कौतुक करत, 'निक अतिशय चांगला असून या बूट लपवण्याच्या प्रथेसाठी आमच्यापेक्षा तोच अधिक उत्सुक असल्याचंही' तिनं सांगतिलं.
परिणीतीने प्रियांकाच्या लग्नावेळी झालेल्या या बूट लपवण्याच्या प्रथेवेळची एक आठवण सांगितली. 'मी विचार केला होता की, या प्रथेसाठी मी निककडे जाऊन खूप पैसे मागेन...पण ज्यावेळी आम्ही तेथे गेलो तेव्हा निकचा एक हेल्पर आधीच तयार होता. त्याच्याकडे डायमंडच्या अंगठी आणि ब्राइडमेड्ससाठी खूप सारे गिफ्ट्स तयार असल्याचं' परिणीतीने सांगितलं.
डिसेंबर २०१८ मध्ये निक आणि प्रियांकाचा उदयपूरमधील उम्मेद भवनमध्ये ख्रिश्चन आणि हिंदू प्रथेप्रमाणे लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर त्यांनी मुंबई आणि दिल्लीमध्ये रिसेप्शनही ठेवलं होतं. या रिसेप्शनमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.