मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे तर चर्चेत आहेच पण ती तिच्या  पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. आम आदमी पार्टीचे चर्चेत राहणारे नेता आणि पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्यासोबत सुरु असलेल्या चर्चांमुळे ती चर्चेत आहे. अनेकदा या दोघांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं आहे.  या दोघांबद्दल आता असंही बोललं जात आहे की, हे दोघंही आपल्या रिलेशनशिपला वेगळं नाव देण्याच्या तयारीत आहेत. आणि हे दोघंही लवकरच साखरपुडा करुन आपलं नात ऑफिशिअल करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या साखरपुड्याचा हा कार्यक्रम देशाची राजधानी दिल्लीमध्ये पार पडणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढावा जेव्हा-जेव्हा पापाराझींनी एकत्र स्पॉट केलं आहे. तेव्हा-तेव्हा या दोघांच्या नात्याची जोरदार चर्चाही झाली आहे. आधी डिनरसाठी आणि मग लंचसाठी यानंतर ती फॅशन डिझाईनर मनिष मल्होत्रा यांच्या घरी जाणं असो, तेव्हापासूनच दोघांच्या रिलेशनशिपच्या अफवा सुरु झाल्या आहेत. हे कपल रिलेशनशिप आणि लग्नाचं प्लॅनिंग करत आहेत. असं म्हटलं जातं की, दोघंही या महिन्यात साखरपुडा करणार आहेत. आणि अभिनेत्री या खास कार्यक्रमासाठी दिल्लीत पोहचली आहे.


साखरपुडा केल्यानंतर ऑफिशअल अनाऊन्समेंट करणार परिणीती आणि राघव
हिंदुस्तान रिपोर्टनुसार, परिणीती आणि राघव एप्रिलमध्ये साखरपुडा करणार आहेत. साखरपुड्याचा हा कार्यक्रम खूप प्राईव्हेट होणार आहे. सुरुवातीपासूनच या जोडीने आपलं नातं गुपित ठेवलं आहे. आणि आत्तापर्यंत यावंर कोणतही स्पष्टीकरण दिलेलं नाही. 
 
खूप प्रायव्हेट पार पडेल साखरपुडा समारंभ
असं म्हटलं जातं की, साखरपुड्याचा कार्यक्रम खूप प्राईव्हेट होणार आहे. ज्यामध्ये फक्त दोघांचे कुटूंबीय उपस्थित असेल. आणि दोघांचा मित्र परिवारही उपस्थित असेल. परिणीतीची बहिण मीरा कपूरही सध्या भारतात आली आहे. त्यामुळे तिच्या कुटूंबीयांना हा कार्यक्रम लवकरात लकवर उरकून घ्यायचा आहे. 
 
गेल्या काहि दिवसांपूर्वी परिणीती आणि राघवला एअरपोर्टवर स्पॉट केलं गेलं होतं.  याआधी परिणीती सेलिब्रिटींशी क्रीडापटू, चित्रपट अभिनेता, उद्योगपती कोणासोबतही लग्न करेन पण राजकारण्याशी लग्न करायला आवडणार नाही". असं वक्तव्य तिने केलं होतं.