परिणीतीला माहिती नव्हतं राघव चड्डा कोण, गुगलवर सर्च करुन..
Parineeti Chopra and Raghav Chadda Love Story: राघव कोण आहे हे मला माहित नव्हते? त्यासाठी मी इंटरनेटवर त्यांच्याविषयी माहिती मिळवली, असे तिने मुलाखतीतून सांगितले.
Parineeti Chopra and Raghav Chadda Love Story: अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी गेल्यावर्षी उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात विवाह केला. त्यांच्या या विवाहाची चर्चा देशभरात रंगली. परिणीती बॉलिवूड सेलिब्रिटी आहे तर राघव आम आदमी पार्टीच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय आहे. दोघांचे क्षेत्र पूर्णपणे वेगळे आहे. दोघांची राज्यदेखील वेगळी आहेत. अशावेळी दोघांची ओळख कशी झाली असेल? असा प्रश्न चाहत्यांकडून विचारला गेला. लग्नाच्या अनेक दिवसानंतर परिणीतीने या चर्चांवरुन पडदा उघडला आहे.
राघव आणि माझी पहिली भेट खूपच रंजक होती, असे ती सांगते. राघव कोण आहे हे मला माहित नव्हते? त्यासाठी मी इंटरनेटवर त्यांच्याविषयी माहिती मिळवली, असे तिने मुलाखतीतून सांगितले.
जेव्हा मी राघवला पहिल्यांदा भेटले तेव्हा मला समजले की आम्ही दोघेही एकमेकांसाठी बनलेले आहेत. पण, राघव कोण होता हे माहीत नव्हते? आणि त्याचे लग्न झाले आहे की नाही हेदेखील माहिती नसल्याचे परिणीती म्हणाली, 'जेव्हा मी राघवला पहिल्यांदा भेटले तेव्हा मला वाटले की नियतीने आम्हाला एकत्र आणले आहे आणि आम्ही एकमेकांसाठी बनलो आहोत. कदाचित राघव तोच असावा ज्याची ती खूप दिवसांपासून वाट पाहत होती, असे ती म्हणाली.
मला राघवबद्दल काहीच माहीत नव्हते. पण माझ्या आतून आवाज ऐकू येत होता की हाच तो आहे ज्याची मी वर्षानुवर्षे वाट पाहत होते. परिणीतीने राघवबद्दलची माहिती गोळा करण्यासाठी गुगलची मदत घेतली. जेव्हा मी त्याच्याबद्दल शोध घेतला तेव्हा मला कळले की तो अविवाहित आहे. यावेळी मी देवाचे आभार मानल्याचे परिणीतीने मुलाखतीवेळी सांगितले.
राघवला भेटून इतकी प्रभावित झाली मी स्वतःला खूप भाग्यवान समजू लागली. तेव्हापासून मी नात्याबद्दल सकारात्मक विचार करायला सुरुवात केल्याचे परिणीतीने सांगितले. दुसरीकडे आपण खूप भाग्यवान असल्याचे त्यालाही वाटले. आतापासून आपले आयुष्य खूप चांगले होणार असल्याची भावना त्यानींही व्यक्त केल्याचे तिने सांगितले. परिणीती आणि राघव दोघेही लंडनमधील लीडर फोरममध्ये गेले होते. या ठिकाणी त्यांचा त्यांच्या क्षेत्रातील चांगल्या कामाबद्दल गौरव करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थितांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.