व्हॅक्सीन घेताच परिणीती चोप्राची झाली अशी अवस्था, फोटो पाहून व्हाल अस्वस्थ
`माझे लसीकरण झाले आहे. काही फोटो मी काढले आहेत. मला खूप वेदना होत आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या लंडनमध्ये आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात आहे. संदीप और पिंकी फरार मध्ये झकळलेल्या परिणीतीने इन्स्टाग्रामवर खुलासा केला की तिने लंडनमध्ये कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला आहे. लसीकरणानंतर तिने आपले काही फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ती अगदी अॅक्टीव्ह अंदाजात दिसतेय. पण त्यानंतरच्या फोटोत ती शांत झोपलेली दिसत आहे.
इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना परिणीती चोप्राने लिहिले की, 'माझे लसीकरण झाले आहे. काही फोटो मी काढले आहेत. मला खूप वेदना होत आहेत. हे फोटो प्रियंका चोप्राने काढले आहेत."
परिणीती लसीकरणाच्या वेळी खूप आनंदी दिसत होती. पण नंतरच्या फोटोत लसीकरणानंतर तिच्या डाव्या हाताला वेदना होत असल्याने दिसून येत आहे. परिणीतीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत काळजी घेण्यास सांगितलं आहे.
यावर्षी परिणीती चोप्राचे ३ सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. यात 'संदीप और पिंकी फरार', 'द गर्ल ऑन द ट्रेन' आणि 'सायना' या सिनेमांचा समावेश आहे. नुकतीच परिणीती चोप्रा तुर्कीमधून परतली आहे. तेथील काही फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.