मुंबई : चित्रपटांच्या शूटिंगसाठी कलाकार अनेकदा अत्यंत वाईट परिस्थितीतही काम करतात. नुकताच परिणीती चोप्रानेही असाच एक किस्सा शेअर केला. जे तुम्हालाही आश्चर्य वाटेल. होय, अभिनेत्री सध्या पंजाबी गायक हार्डी संधूसोबत चित्रपटाचं शूटिंग करत असून या शूटिंगमध्ये येणाऱ्या अडचणी तिने सांगितल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिजाबमध्ये परिणीती 
परिणीती चोप्राने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती हिजाब परिधान करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, -12° मध्ये हे माझे आतापर्यंतचे सगळ्यात थंडीतलं शूट आहे. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे माझ्या हिरोलाही माझ्यासारखाच अतिशय स्लिम पोशाख घालून थंडीचा सामना करावा लागला. ठंडी समता अभियानांतर्गत हा न्याय आहे.



पिण्याचं पाणी नाही मिळालं
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये परिणिती चोप्राने व्हिडीओमध्ये सांगितलं आहे की, तिला सेटवर पाणीही मिळत नाही. तिने व्हिडिओमध्ये सांगितलं की, 'आम्ही सेटवर मायनस 12 डिग्री तापमानात पाणी पिऊ शकत नाही कारण सगळं पाणी गोठलं होतं आणि पाणी अनफ्रीझ करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टीही गोठल्या होत्या. जसं गॅस, व्हॅन. हार्डी संधूने सांगितलं की, कॅमेराही बर्फाने भरला होता.