कोरोना काळात थिएटरमध्ये सिनेमांच्या रिलीजला जो ब्रेक लागलाय, तो अनलॉक झाल्यानंतरही म्हणावा तसा पूर्वपदावर आलेला नाही. अनेक सिनेमे हे ओटीटी प्लॅटफॉर्मवरच रिलीज होत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेक सिनेमे हे थिएटरमध्ये रिलीज होण्याबाबतच्या तारखा जाहीर करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री परिणीती चोप्रा हीचा सायना हा चित्रपत २६ मार्च २०२१ ला प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा ओटीटी नाही तर सिनेमागृहात दाखवला जाईल. स्वत: परिणीती चोप्रानेही तिच्या विविध सोशल मीडियावरील अकाऊंटवर ही माहिती शेअर केली आहे. अमोल गुप्ता यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हीच्या आयुष्यावर आधारित या सिनेमाची कहाणी असणार आहे. आजच या सिनेमाचा टिजर रिलीज झाला आहे. मात्र या टीजरमध्ये परिणीतीची अगदी हलकीशीच झलक पाहायला मिळतेय. सायनाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या भूमिकेत मानव कौर आहे. या चित्रपटाच्या टिझर रिलीजनंतर सायनानेही ट्विट केलंय.



 


या सिनेमाचं पोस्टरही रिलीज झालंय, ज्यात शटल कॉक दिसतंय. शिवाय मार दूंगी अशीही एक ओळ लिहिण्यात आली आहे. हातामधील ग्लोव्जवर तिरंग्याचे रंग आहेत. खरतर परिणीती चोप्राआधी हा सिनेमा अभिनेत्री श्रद्धा कपूरला मिळाला होता. सायना नेहवालच्या रूपात श्रद्धाचे काही फोटोजही समोर आले होते. मात्र नंतर हा सिनेमा परिणीती चोप्राला मिळाला.


नुकताच परिणीती चोप्राचा द गर्ल ऑन द ट्रेन हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.