लहान वयातील त्या एका चुकीमुळे अभिनेत्रीवर आले वाईट दिवस, पाहा कोण आहे ती
सर्वात पॉझिटीव्ह आणि सुसंस्कृत सूनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात एकदम बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.
मुंबई : अभिनेत्री पूजा बॅनर्जी तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत असते. सर्वात पॉझिटीव्ह आणि सुसंस्कृत सूनेची भूमिका साकारणारी पूजा बॅनर्जी खऱ्या आयुष्यात एकदम बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. चाहते तिच्या लूक आणि अभिनयावर घायाळ आहेत. मात्र, पूजा बॅनर्जीबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की पूजा खूप लहान वयात प्रेमात पडली होती आणि यामुळे ती वयाच्या 15 व्या वर्षी घरातून पळून गेली.
भरपूर लहान वयात पडली होती प्रेमात
अभिनेत्रीने एका टॉक शोमध्ये तिच्या घरातून पळून गेल्याची माहिती दिली होती. पूजाच्या म्हणण्यानुसार, ती वयाच्या १५ व्या वर्षी प्रेमात पडली होती. लहान वयातच प्रेमात पडल्यामुळे तिला हेच आपलं जग वाटू लागलं आणि म्हणूनच ती त्या व्यक्तीसोबतचं घर सोडून पळून गेली. त्यानंतर ती कधीच घरी परतली नाही.
पूजाला घर सोडल्याचा खूप पश्चाताप कधीच झाला नाही. घरातून पळून गेल्यानंतर तिने कधीही घरी परत न जाण्याचा निर्णय घेतला. कारण ज्यामुळे तिच्या वागणूकीमुळे आई-वडीलांना लाजेने मान खाली घालण्यास भाग पाडलं. त्यामुळे तिने मनाशी ठाम ठरवलं होतं की, जेव्हा कामातून अचिव्हमेंट करेन तेव्हाच त्यांच्यासमोर जाईन. त्यामुळेच तिने मुंबईत राहून संघर्ष केला आणि आपलं करिअर घडवण्यात यश मिळवलं. संघर्षादरम्यानच पूजाची कुणाल वर्माशी भेट झाली.
लग्नाआधी दिला मुलाला जन्म
विशेष म्हणजे पूजाने अभिनेता कुणाल वर्मासोबत लग्न केलं आहे. 'तुझ संग प्रीत लगाई सजना' या शोदरम्यान पूजा-कुणालची पहिली भेट झाली आणि दोघंही प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनी 9 वर्षे एकमेकांना डेट केलं. दोघांनी मार्च 2020 मध्ये कोर्ट मॅरेज केलं होते आणि नोव्हेंबर 2021 मध्ये दोघांनीही एकमेकांसोबत रितीरिवाजांनी लग्नगाठ बांधली.
या जोडप्याच्या लग्नाची सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे त्यांचा एक वर्षाचा मुलगा कृशिव देखील त्यांच्या पारंपारिक लग्नाला उपस्थित होता. रिपोर्टनुसार, पूजा लग्नाआधीच प्रेग्नंट झाली होती. 9 ऑक्टोबर 2020 रोजी तिने मुलगा कृशिवला जन्म दिला. कोर्ट मॅरेजनंतर सहा महिन्यांनी तिने मुलाला जन्म दिला.