मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राधिका मदानचा करिअरचा ग्राफ झपाट्याने उंचावला आहे. 2018 साली 'पटाखा' या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या राधिका मदानची अवघ्या तीन वर्षांत इंडस्ट्रीतील सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये गणना होऊ लागली आहे. अभिनेत्रीच्या फॅन फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली असून आज फक्त इंस्टाग्रामवर 31 लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राधिकाची बोल्ड स्टाइल चाहत्यांना आवडते
राधिकादेखील सोशल मीडियावर चाहत्यांसाठी तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यातील फोटो शेअर करत असते. राधिका अजून पर्यंत तरी कोणत्याही चित्रपटात खूप बोल्ड स्टाईलमध्ये दिसली नसली तरी ती तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर अनेकदा शेअर करते.


ब्लॅक आणि गोल्डन बिकिनीमध्ये शेअर केला फोटो
नुकताच राधिका मदनने स्वतःचा बिकिनीमधील एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती ब्लॅक आणि गोल्डन रंगाची बिकिनी परिधान करून वॉर्डरोबमध्ये बसलेली दिसत आहे. तिने एकूण दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती कपाटात बसलेली दिसत आहे. हे फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिलं आहे की, बस्स.. मी फक्त अशीच लटकली आहे.



अभिनेत्रीचे असे फोटो पाहून अंदाज लावण खूप कठिण आहे की, अखेर ती कपटामध्ये बसून काय करतेय. तर ती फक्त फोटो क्लिक करण्यासाठी आणि एक युनिक पोज देण्यासाठी असं करत आहे. अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, राधिका नुकतीच 'शिद्दत' सिनेमात दिसली होती. सिनेमात तिने फिमेल लीड रोल प्ले केला होता.