Pathaan Box Office Collection Day 10 : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या त्याच्या पठाण चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'पठाण'नं (Pathaan Box Office Collection) बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. दरम्यान, आता पठाणच्या 10 दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती समोर आली आहे. शाहरुखच्या पठाणनं डबल डिजीटमध्ये कमाई करण्याचा एक नवा रेकॉर्ड सेट केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पठाणच्या बॉक्स ऑफिसवर एक नवा रेकॉर्ड केला आहे. बऱ्याच दिवसांपासून जिथे बॉलिवूडचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत नव्हता तिथे शाहरुखच्या पठाण चित्रपटानं सगळ्यांना चित्रपटगृहांकडे वळवलं आहे. पठाणला प्रदर्शित होऊन 10 दिवस झाले आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही पठाणचे बहुतेक शो हे हाऊसफुल आहेत. 


हेही वाचा : Aryan Khan हिंदू की मुस्लिम? Shah Rukh Khan च्या पत्नीकडून खुलासा


पठाणच्या दहाव्या दिवसाची आकडेवारीही आता समोर आली आहे. शाहरुख खानच्या चित्रपटाने 10व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या शुक्रवारी डबल डिजीटमध्ये कमाई करत तो खरंच बॉलिवूडचा किंग असल्याचे दाखवून दिले आहे. शाहरुखच्या चित्रपटानं 10 व्या दिवशी 13 ते 15 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटानं संपूर्ण भारतात केलेल कलेक्शन हे 378 ते 380 कोटी असल्याचे म्हटले जात आहे. याचा अर्थ पठाण लवकरच 400 कोटींच्या क्लबमध्ये जाणार असे म्हटले जाते. 


पठाणने वर्ल्ड कलेक्शनच्या 9 व्या दिवसापर्यंत 700 कोटींचा आकडा पार केला होता. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठी ओपनिंग करणारा हा चित्रपट ठरला आहे. पठाणनं फक्त पहिल्याच दिवशी नाही तर त्यानंतरही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. ज्यामुळं जॉन अब्राहम (John Abraham) , शाहरुख खान आणि (deepika padukone) दीपिका पदुकोणच्या कारकिर्दीतील हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. किंबहुना शाहरुखनं आतापर्यंत भूमिका साकारलेल्या सर्वच चित्रपटांच्या कमाईला 'पठान'नं पिछाडीवर टाकलं आहे.


प्रदर्शनानंतर या चित्रपटानं पहिल्याच आठवड्याच कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेतच. जागतिक पातळीवर 700 कोटी रुपयांची कमाई करणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट ठरला आहे. दर दिवशी या चित्रपटाच्या कमाईत मोठी भर पडत असून, अनेक विक्रमही तो मोडीत काढताना दिसत आहे. बरं याला होणारा विरोध आता मावळला असून, अनेकांनीच चित्रपटाला पसंतीही दिली आहे. तुम्ही 'पठान' पाहिलाय का?