Mahant Raju Das Statement On Deepika Padukone Shahrukh Khan Pathaan : बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खानच्या (shahrukh khan) 'पठाण' (Pathan) चित्रपटात 'बेशरम रंग' नावाच्या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदूकोणनं घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन वाद पेटला आहे. दीपिकाच्या(deepika padukone) ऑऊटफिटवर हिंदू संघटना भडकल्या आहेत. पठाण चित्रपट बॅन करण्याची मागणी केली जात आहे. तसेच सोशल मिडीयावर देखील बायकॉट पठाणचा ट्रेंड(Boycott Pathaan trends) पहायला मिळत आहे. अयोध्येतील हनुमानगढीचे महंत राजू दास यांनी यावर नुकतच वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महंत राजू दास यांनी शाहरुख आणि त्याचा आगामी चित्रपट 'पठाण'वर निशाणा साधला आहे. शाहरुख सातत्यानं हिंदू धर्माचा अपमान करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  महंत राजू दास यांनी लोकांना सांगितले की ज्या थिएटरमध्ये 'पठाण' चित्रपट प्रदर्शित होईल, त्या थिएटरला आग लावण्यास सांगितले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महंत राजू दास म्हणाले की, 'शाहरुख नक्कीच हिंदू धर्माची खिल्ली उडवण्यासाठी काहीतरी करतो. चित्रपटात सनातन संस्कृतीचा भगवा रंग ज्या प्रकारे दाखवण्यात आला त्यामुळे आम्ही दुखावलो आहोत. हा रंग संतांचा आणि देशाचा आहे.' अभिनेत्री दीपिका पदुकोणला भगव्या रंगाची बिकिनी परिधान करण्याची काय गरज होती. मी म्हणतो की पठाण चित्रपट कोणत्याही थिएटरमध्ये असेल, त्या थिएटरला आग लावून टाका. जोपर्यंत असे काही होत नाही, तोपर्यंत कोणीही विश्वास ठेवणार नाही.' दरम्यान, यापूर्वी 'पठाण' चित्रपटाचे पोस्टर प्रयागराजमध्ये जाळण्यात आले होते. भाजप कार्यकर्त्यांनी चित्रपट आणि अभिनेत्याच्या विरोधात घोषणाबाजी केली. 


बेशरम गाण्याप्रमाणे दीपिकाने कपडे देखील असेच बेशरम घातले


'पठाण' सिनेमात 'बेशरम रंग' नावाच्या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकीनी घातली आहे. दीपीकाने मुद्दाम भगव्या रंगाचा ऑऊॉफिट घातल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या बिकनीवरुन आता नवा वाद सुरु झाला आहे. गाण्याचे बोल आणि दीपिकाच्या कपड्यांचे रंगात परफेक्ट मॅचिंग झाले आहे. बेशरम गाण्याप्रमाणे दीपिकाने कपडे देखील असेच बेशरम घातले असल्याची टीका होत आहे. दीपिकाच्या ऑऊटफिटवर हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला असून 'पठाण' चित्रपट बॅन करण्याची मागणी केली जात आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


फिफा विश्वचषक फायनलच्या दिवशी शाहरुख करणार हे काम 


शाहरूख खानने त्याच्या इन्टाग्राम पोस्टमध्ये (Shah Rukh Khan Instragram) मोठी घोषणा केली. प्री-मॅच कव्हरेज दरम्यान, ब्रॉडकास्टरने 'पठाण' ची क्लिप देखील शेअर केली आणि 18 डिसेंबर रोजी म्हणजेच फिफा विश्वचषक फायनलच्या (Argentina Vs France final Match) दिवशी शाहरूख स्टुडिओमध्ये उपस्थित राहणार असल्याचंही जाहीर केलंय. मैदानात मेस्सी (Messi) आणि म्बाप्पे (mbappe)... तर स्टूडियोमध्ये समालोचक वेन रुनी (wayne rooney) आणि मी, असं शाहरूख या पोस्टमध्ये म्हणाला आहे.