नवी दिल्ली : दिग्दर्शक अनुराग कश्यपवर पायल घोषने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले. यानंतर त्याच्या वकिलाने हे आरोप खोटे असल्याचे स्टेटमेंट जाहीर केले. पण यानंतर पायल घोषने पुन्हा एकदा अनुरागवर निशाणा साधलाय. पायलचे ट्वीट काही मिनिटातच वायरल होतंय.रिया चक्रवर्ती प्रकरण सुरु असताना अनुरागने एक ट्वीट कर पितृसत्ताकला जशास तसं उत्तर द्यायला हवंय असं म्हटलं होतं. पायलने याच पोस्टचा आधार घेत अनुरागवर निशाणा साधला. लोक महिलांना दोष देतात आणि पितृसत्ताक संपवण्याबद्दल बोलतात असा टोला तिने लगावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान अनुरागच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी म्हणजेच आरती बजाज आणि कल्की केक्ला यांनी त्याची पाठराखण केली. पायल घोष हिच्याकडून अनुरागवर करण्यात आलेले आरोप म्हणजे एक घाणेरडा स्टंट असल्याचं आरतीचं ठाम मत आहे. तर, सोशल मीडियावर सुरु असणाऱ्या या सर्व निराशाजनक घटनांचा स्वत:वर परिणाम होऊ देऊ नकोस, असं लिहित कल्कीनंही त्याला पाठिंबा दिला आहे. 



'अनुराग, तू खऱ्या अर्थानं रॉ़कस्टार आहेस. महिलांच्या सबलीकरणासाठी तू जसं काम करत आहेस ते सुरुच ठेव. हे साऱं मी आपल्या मुलीच्या बाबतीच पहिल्यांदा पाहिलं आहे. या जगात प्रामाणिकपणा उरलेला नाही', असं आरतीनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. इतरांचा द्वेष करण्यात व्यर्थ जाणारी उर्जा रचनात्मकरित्या वापरल्यास हे जग आणखी उत्तम असेल, असं म्हणत तिनं अनुरागवर आरोप करणाऱ्यांवर निशाणा साधला. 



दुसरीकडे कल्कीनंही अनुरागच्या समर्थनार्थ एक पोस्ट लिहिल्याचं पाहायला मिळालं. 'महिल्यांच्या स्वातंत्र्यासाठी तू तुझ्या चित्रपटांच्या माध्यमातून लढा दिला आहेस. त्यांची अखंडता कायम राखण्यासाठी तू खासगी आणि व्यावसायिक अशा दोन्ही आयुष्यांमध्ये लढला आहेस', असं म्हणत आपण अनुरागच्या आयुष्यात येण्याआधी आणि त्याच्या आयुष्यात आल्यानंतरही याचा अनुभव घेतल्याचं कल्कीनं लिहिलं. घटस्फोटानंतरही अनुरागनं आपल्याला आधार दिल्याचं म्हणत सोशल मीडियावर सुरु असणाऱ्या या आरोप- प्रत्यारोपांच्या सत्राचा स्वत:वर काहीच परिणाम होऊ देऊ नकोस असं तिनं अनुरागला उद्देशून म्हटलं आहे. 


अनुरागच्या पाठिशी उभ्या असणाऱ्या या मंडळींच्या प्रतिक्रिया पाहता या अडचणीच्या प्रसंगी ही बाब त्याला दिला देणारी ठरेल यात शंका नाही. दरम्यान, अभिनेत्री पायल घोषने अनुराग कश्यपवर काही गंभीर आरोप केल्यानंतर या प्रकरणानं डोकं वर काढलं होतं. अनुराग कश्यपनं माझ्यासोबत जबरदस्ती केली असल्याचं सांगत पायल घोषनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत कारवाई करण्याची विनंती केली होती. याबाबत सांगणं माझ्यासाठी नुकसानकारक असून माझी सुरक्षितताही धोक्यात असल्याचं सांगत, तिने मदतीची विनंती केली होती. 


मी अनेकदा यासंदर्भात ट्वीट केलं आणि डिलीट केलं. ट्वीट डिलीट कर असे माझ्या मॅनेजरने भावाला सांगितले. हे सारे माझे हितचिंतक आहेत. माझी फॅमिली संकुचित आहे. ती मला सपोर्ट करणार नाही. हे सर्व सोड आणि घरी चल असे ते म्हणतील. पण अनुरागने मला सॉरी म्हटलं असत तर बरं झालं असतं.


कोणाची हिम्मत होत नाही हे बोलण्याची. मला हे बोलायला ६ वर्ष लागली. बॉलीवुडमध्ये सर्वजण वाईट नसतात. सर्वजण ड्रग्ज घेतात असं नाही पण कोणीच ड्रग्ज घेत नाही असेही नाही.


महिला आयोग साथीला


पायल घोषच्या साथीला राष्ट्रीय महिला आयोग धावली आहे. काल रात्री पायल घोषने ट्वीट करत २०१५ साली अनुराग कश्यपने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले. जर ती तक्रार करणार असेल तर महिला आयोग तिच्यासोबत आहे असे अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटलंय. पायल घोषने अनुराग कश्यपविरोधात केस दाखल केलेली नाही. परंतु राष्ट्रीय महिला आयोगच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी पायलकडे याबाबत संपूर्ण माहिती मागितली आहे. ज्याद्वारे त्या या प्रकरणात कारवाई करु शकतील.


अनुराग कश्यपवरील आरोपांनंतर कंगनाने पायलच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. कंगनाने #MeToo हा हॅशटॅग वापरत, अनुराग कश्यपच्या अटकेची मागणी केली आहे. यापूर्वीही सुशांत प्रकरणावरुन कंगना आणि अनुराग कश्यप यांच्यात ट्विटरवॉर पाहायला मिळाला होता.


पायल घोष आहे तरी कोण? 


पायल घोष एक अभिनेत्री आहे. जिने दक्षिण आणि हिंदी सिनेमात काम केलं आहे. पायल घोषने २०१७ मध्ये ऋषि कपूर यांच्या 'पटेल की पंजाबी शादी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. कोलकाताची राहणारी पायलने 'सेंट पॉल्स मिशन' शाळेल शिक्षण तर स्कॉटिश चर्च कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतलं. सध्या ती मुंबईत राहत आहे. 


१७ व्या वर्षी पायल घोषने बीबीसीच्या टेलीफिल्म Sharpe's Peril मध्ये काम केलं आहे. ती या सिनेमांकरता एका मित्रासोबत गेली होती आणि सिलेक्ट झाली. 


इंग्रजी सोल्जर Richard Sharpe यांच्यावर आधारित असलेल्या या सिनेमात पायलने बंगालमधील एका स्वातंत्र्य सेनानीच्या मुलीची भूमिका साकारली होती. जी गावात राहणारी मुलगी आहे. 


तसेच पायलने एका कॅनेडियन सिनेमांतही काम केलं होतं. ज्यामध्ये तिने एका शाळेच्या मुलीची भूमिका साकारली होती. या मुलीने आपल्या शेजारच्या नोकराशी प्रेम केलं होतं. 


पायलच्या आई-वडिलांनी तिने सिनेमांत काम करावं असं वाटत नव्हतं. यामुळे कॉलेजच्या सुट्यांमध्ये ती कोलकातावरून मुंबईला धावत आली होती. त्यानंतर मुंबईत नावांकित किशोर ऍक्टिंग अकॅडमी जॉईन केली. तिथेच पायलची ओळख चंद्रा शेखर येलेती यांच्याशी झाली. ज्यांनी पायलला तेलुगू सिनेमा Prayanam काम केलं आहे. या सिनेमात तिच्यासोबत मंछु मनोजने काम केलं आहे.