मुंबई : अभिनेत्री पायल रोहतगीने भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे वडिल मोतीलाल नेहरू यांच्याविरोधात आक्षेपार्ह टीका केली होती. या संदर्भात राजस्थान पोलिसांनी पायलला अटक केली आहे. आता तिला जामीन मिळाला असला तरीही पायली तुरूंगातील पहिली रात्र कशी गेली? हे जाणून घेणं महत्वाचं ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुरुंगातील एका रात्रीचा अनुभव शेअर करताना पायल म्हणते की,'तुरूंगात भरपूर थंडी होती. तसेच तुरूंगात भरपूर अस्वच्छता होती. मी खूप घाबरलेली होती. हे खूप भितीदायक असून मी थंड जमिनीवर फक्त चटई अंथरूण झोपली होती.'


पुढे पायल सांगते की,'मी आशा करते की, तुरूंगात जाण्याची ही शेवटची वेळ असेल. मी फिमेल जनरल वॉर्डमध्ये होती. तिथे अनेक महिला होत्या. त्यांनी त्यांचा अनुभव माझ्यासोबत शेअर केला. त्यांच्या समस्या ऐकून मी खूप भावूक झाले.'


'माझ्यासोबत तुरूंगात 5 कट्टर गुन्हेगार होते. तसेच तुरूंगातील जेवण चांगल नव्हतं मात्र जे लोकं तिखट खाणं पसंत करतात त्यांच्यासाठी हे चांगल होतं.', अशा शब्दात पायलने पहिल्या रात्रीचा अनुभव सांगितला. 


 


पायलने तुरूंगातून बाहेर आल्यावर आनंद व्यक्त केला. चाहत्यांचे आभार देखील मानले. राजकारण करून मला या प्रकरणात गोवण्यात आल्याचं पायल सांगते. मी कायम देशाचा विचार करते आणि मी माझ्या देशाचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करते. पण मी चुकीच्या पद्धतीने तुरूंगात गेल्याची भावना पायलने व्यक्त केली. न्यायदेवतेचे पायलने आभार मानले आहेत. 


पुढे पायल म्हणते की,'जरी मी तुरूंगात गेले तरी मी व्हिडिओ बनवणं बंद करणार नाही. पण मी पु्न्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घेईन. '