मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून ' पहरेदार पिया की ' ही मालिका वादांमध्ये अडकली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आता या मालिकेशी निगडीत वाद संपवण्यासाठी १२ वर्षांचा लीप दाखवण्यात येणार आहे.   'पहरेदार पिया की ' या मालिकेत काही कारणास्तव १८ वर्षाच्या मुलीचा विवाह ९ वर्षाच्या मुलाशी होतो असे दाखवण्यात आले होते. या कारणामुळेच ही मालिका वादात अडकली. 


 काही मिडीया रिपोर्टच्या अहवालानुसार, या मालिकेशी निगडीत वाद आणि कारवाई टाळण्यासाठी लीप घेण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. एका वेब पोर्टलला मिळालेल्या माहितीनुसार ३२ एपिसोड्सनंतर लीप घेण्यात येईल.  
 
  'पहरेदार पिया की ' या मालिकेविरोधात एक ऑनलाईन याचिका सादर करण्यात आली होती. लाखो लोकांनी याला पाठिंबा दाखवल्यानंतर या मालिकेच्या प्रसारण वेळेत बदल करण्यात आले. आता ही मालिका सोनी चॅनलवर रात्री १०.३० वाजता प्रसारीत केली जाते. 
 
मालिकेत लीप आल्यानंतर 'रत्न' ची भूमिका कोण साकारणार यासाठी सध्या ऑडिशन्स सुरू आहेत. ही भूमिका पुढे कोण साकारणार  ? आणि काय ट्विस्ट घेणार याबाबत सार्‍यांच्याच मनात उत्सुकता आहे.