रॅम्पवर उतरली पलक तिवारी...मात्र `या` कृतीमुळे चाहत्यांकडून ट्रोल
पलकने मोठ्या आत्मविश्वासाने रॅम्प वॉक करून अनेकांची मने जिंकली मात्र तरीही काही चाहत्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
मुंबईः अभिनेत्री पलक तिवारी गेल्या काही दिवसांपासून सैफचा मुलगा इब्राहिमसोबतच्या नात्यामुळे चर्चेत होती मात्र आता ती तिच्या रॅम्पवॉकमुळे चर्चेत आली आहे.
पलकने मोठ्या आत्मविश्वासाने रॅम्प वॉक करून अनेकांची मने जिंकली. मात्र तिच्या काही चाहत्यांना पलकची चालण्याची स्टाईल आवडली नाही त्यामुळे पलकला तिच्या चालण्यावरून प्रचंड ट्रोल केलं.
श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी तिच्या पहिल्याच 'बिजली-बिजली' या सुपरहिट गाण्यानंतर मोठी स्टार बनली आहे. पलकने तिच्या ऍक्टिंग आणि डान्सने फॅशन जगतातही अधिराज्य गाजवले आहे अलीकडेच तिने 'दिल्ली टाइम्स फॅशन वीक'मध्ये पलकने आता तिच्या ग्लॅमरस लुकने सर्वांना मोहित केलं.
पलक तिवारी स्मार्ट वॉच ब्रँड फायर-बोल्टची शोस्टॉपर बनली. या दरम्यान पलक काळ्या लेदर पॅन्टसह ब्रॅलेट टॉप आणि ब्लॅक जॅकेट परिधान केलं होतं. पलक तिवारी या लूकमध्ये खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती. त्याचबरोबर तिने हलका आणि न्यूड मेकअप केला होता, ज्यामुळे पलक तिवारीचे सौंदर्य पाहण्यासारखे होते. तिचे हे फोटो पाहून चाहते तिचे कौतुक करताना थकत नाहीत.
पलक तिवारीचा हा लूक चांगलाच व्हायरल होत आहे. तिने पूर्ण आत्मविश्वासाने रॅम्प वॉक केला. पण तिचा आत्मविश्वास आणि लूक अनेकांना आवडला नाही. तिची चालण्याची शैली अनेकांना आवडली नाही आणि त्यामुळे तिला ट्रोल देखील केले जात आहे. सोशल मीडियावर लोकांनी तिला ट्रोल केलं असून वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत.
एका यूजरने लिहिले की, "प्रत्येकजण सर्वकाही करू शकत नाही, तुम्ही फक्त बिजली बिजलीच कर." दुसर्या एका युजरने लिहिले की, "हिला चालताही येत नाही." मात्र, काही युजर्सनी तिचं कौतुकही केले आहे. अनेक युजर्सनी कॉमेंट सेक्शनमध्ये फायर आणि हार्टसारखे इमोजी पोस्ट केले आहेत.
नुकतेच पलक तिवारीचे आणखी एक 'मांगता है क्या' गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात पलक तिवारी आणि आदित्य सील यांची जबरदस्त केमिस्ट्री पडद्यावर दिसली आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केले आहे.