मुंबई : विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी 9 डिसेंबर 2021 रोजी पारंपारिक पद्धतीने लग्न केले. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे दोघांचे लग्न पार पडले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतर लगेचच,हे जोडपे हनिमूनसाठी रवाना झाले.मुंबईला परत येत कामाला देखील दोघांनी सुरुवात केली. शूटिंगमध्ये दोघेही व्यस्त झाले. आता दोघेही अनेक बॉलिवूड पार्टींमध्ये एकत्र हजेरी लावतात. त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी होते.


नुकतेच विकी आणि कतरिना जोडीने करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीत दिसून आले. धर्मा प्रोडक्शनचे सीईओ यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला.बॉलिवूडच्या सर्व कलाकारांनी या पार्टीला हजेरी लावली होती.


कतरिना आणि विकी यांनी रेड कार्पेटवर फोटो क्ली केले. दोघांनी जोडीने काही रोमॅन्टिक फोटो काढले. त्यानंतर विकी पुढे निघाला असता कतरिनाला सिंगल काही फोटोसाठी विचारण्यात आलं. तेव्हा विकी कतरिनाचं फोटो सेशन पुर्ण होऊ पर्य़ंत बाजूला थांबला.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


जसं कतरिनाचे फोटो क्लीक करुन झाले. तिला स्टेजवरुन उतरण्यासाठी विकीने हात दिला. तिचा हात धरुन तो आत निघून गेला. 


कतरिनासाठी तो जमेल त्यापद्धतीने आपलं प्रेम व्यक्त करताना दिसतो. इव्हेंटमध्ये तो कतरिनाची काळजी घेताना दिसतो. त्याचे कतरिनासोबतचे बॉण्डिंग चाहत्यांना फार आवडते. त्यामुळे विकी कौशल हा prefect husband आहे अशी चर्चा होत आहे.