मुंबई : बॉलीवुड अभिनेत्री कंगना रानौतच्या (Kangana Ranaut) अडचणीत वाढ होताना दिसतेय.  मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court)गुरुवारी कंगनाविरोधात याचिका दाखल करण्यात आली. ट्विटरवरुन सातत्याने द्वेष पसरवण्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आलाय. ट्वीटरच्या माध्यमातून देशभरात द्वेष पसरवणे, बेताल विधानं करुन  देशद्रोह पसरवण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप कंगनावर याचिकेतून केलाय. कंगनाच्या ट्विट्समुळे दोन गटात भांडणाचा प्रयत्न होतो. एखाद्या धर्मासंदर्भात तिने वादग्रस्त विधान केल्याचेही यात म्हटलंय.


'ट्विटरशिवाय इतर पर्याय'



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझ्याकडे ट्विटरशिवाय इतर पर्याय देखील असल्याचे कंगना म्हणते. व्यक्त होण्यासाठी माझ्याकडे ट्विटर हे एकमेव माध्यम नाही. मी नेहमी अखंड भारताबद्दल बोलते. टुकडे टुकडे गॅंगविरोधात मी रोज लढते आणि माझ्यावर देश विभाजनाचा आरोप केला जातो असे ती म्हणाली.



कंगनाने गायक आणि अभिनेता असलेल्या दिलजीत दोसांजर बोचरी टीका केल्याने पुन्हा वादात सापडली. यावेळी कंगनाने सगळ्या मर्यादांच उल्लंघन केल्याचं दिसतं आहे. अभिनेता आणि गायक असलेल्या दिलजीत दोसांजरने कंगनावर शेतकरी आंदोलनावरून टीका केली होती. आंदोलनात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेची कंगनाने खिल्ली उडवली होती. त्यावरून तिला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. 



यावर दिलजीतने कंगनाला भरपूर फटकारलं होतं. याचा पलटवार करताना कंगनाने सर्व मर्यादा ओलांडल्या. 'ओ करण जोहर के पालतू' म्हणतं तिने ट्विट केलं आहे. कंगनाला टॅग करत दिलजीतने एक ट्विट केलं होतं. दिलजीतने एक व्हिडिओ शेअर करत कंगनाला फटकारलं होतं. त्यालाच प्रत्युत्तर देत कंगनाने वादग्रस्त विधान केले.