मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दराने मंगळवारी नवीन उंची पाहायला मिळाली आहे. सतत 15 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ पाहायला मिळाली आहे. मंगळवारी दिल्लीत पेट्रोलच्या दरात 16 पैसे प्रति लीटर आणि डिझेलच्या दरात प्रती लीटर 19 पैसे वाढ झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वाढीनंतर मंगळवारी दिल्लीत पेट्रोलचा किंमत 79.31 रुपये प्रती लीटर असून डिझेलची किंमत 71.34 रुपये प्रती लीटर आहे. तर मुंबईत सोमवारी पेट्रोलची किंमत 86.72 रुपये प्रती लीटर असून डिझेलची किंमत ही 75.74 रुपये प्रती लीटर आहे.  



मुंबईची वाईट अवस्था दिल्लीप्रमाणेच आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे. मंगळवारी मुंबईत पेट्रोलची किंमत 86.72 रुपये प्रती लीटर असून डिझेलची किंमत 75.74 रुपये प्रती लीटर आहे. गेल्या 15 दिवसांपासून हा फरक दिसत आहे. सोमवारी तर डिझेलची किंमत 71.15 रुपये प्रति लीटर दर आहे. मुंबईत सोमवारी पेट्रोलची किंमत 31 पैशांनी वाढली असून आता दर 86.56 रुपये इतका आहे. तर डिझेलमध्ये 44 पैशांनी वाढ झाली आहे. ज्याचा दर आता 75.54 रुपये प्रती लीटर आहे.


पेट्रोलची गेल्या 8 दिवसांतील वाढता दर 


तारीख

किंमत

वाढ

2 सप्टेंबर

86.25 रुपये

0.16

1 सप्टेंबर

86.09 रुपये

0.16

31 ऑगस्ट

85.93 रुपये

0.21

30 ऑगस्ट

85.72 रुपये

0.12

29 ऑगस्ट

85.60 रुपये

0.13

28 ऑगस्ट

85.47 रुपये

0.14

27 ऑगस्ट

85.33 रुपये

0.13

26 ऑगस्ट

85.20 रुपये

0.11

25 ऑगस्ट

85.09 रुपये

0.00

24 ऑगस्ट

85.09 रुपये

0.09