मुंबई : प्रियंका चोप्रा आणि निक जोनास हे जोडपं सध्या युरोपमध्ये रोमान्टिक अंदाजात फिरताना दिसतंय. नुकताच, निकच्या भावाचा म्हणजेच जो जोनास आणि सोफी टर्नर यांचा भव्यदिव्य पण खासगी असा विवाह सोहळा पार पडला. यावेळी अनेकांच्या नजरा टिकून होत्या त्या प्रियंका आणि निक या जोडप्याकडे... हे दोघेही आपले फोटोंच्या माध्यमातून आपले क्षण शेअर करून चाहत्यांना कपल गोल्स देत आहेत. नुकताच प्रियांकानंही निकसोबत आपला एक फोटो शेअर केलाय. एका सुंदर अशा युरोपियन कॉटेजमधला हा फोटो आहे... या फोटोत प्रियंका-निकच्या मागे सुंदर असं निसर्गही दिसतोय. प्रियंकानं या फोटोला कॅप्शन दिलं... 'हवेतही हेच (प्रेम) आहे' 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अगोदर जो-सोफीच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी साऊथ फ्रान्समध्ये दाखल झालेल्या प्रियंकानंही अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या फोटोत तिच्यासोबत तिचा दीर केविन जोनासही दिसत आहे. काळ्या गाडीच्या बाजुला केविन उभा असलेला दिसत आहे. 



प्रियंका आणि निकनं एकमेकांच्या कुटुंबालाही आपलंसं करून घेतल्याचंच हे चित्र आहे. 



याआधीही प्रियंका आणि निक पॅरीसमधल्या एका खासगी याचमध्ये पार्टी करताना आणि एकमेकांसोबत डान्स करताना दिसले होते.