मुंबई : अभिनेत्री अनिता दाते हिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. अनेक सेलिब्रिटी देखील या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री अनिता दातेच्या या फोटोला हार घालण्यात आला आहे. पण खुद्द अनिता दाते हिच्या इन्स्टा अकाऊंटवरुनच हा फोटो शेअर 


करण्यात आला आहे. या फोटो सोबत 'जो आवडतो सर्वांना' असं कॅप्शन देखील देण्यात आलं आहे.


हा फोटो शेअर करण्यामागचं कारण अजून तरी समोर आलेलं नाही. पण या फोटोमुळे तिचे चाहतेच नाही तर इतर सेलिब्रिटींना देखील प्रश्न पडलाय की, नेमका या फोटो मागचा अर्थ काय?



अभिनेत्री अनिता दाते ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या झी मराठीच्या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचली. आपल्या अभिनयाने तिने अनेकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलंय.