मुंबई : हरियाणवी गाण्यांसहीत आपल्या डान्सनं आणि अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी सपना चौधरी अनेकदा वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी राजकीय संबंधांसाठी चर्चेत आलेली सपना आता आपल्या नव्या लूकसाठी चर्चेत आलीय. अनेकदा सोशल मीडियावर सपना चौधरीचे डान्स व्हिडिओ व्हायरल होतात. परंतु, आता मात्र सपना आपल्या नवीन फोटोशूटमुळे चाहत्यांच्या टीका-टीप्पणीला सामोरी जातेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आत्ता-आत्तापर्यंत देसी लूकमध्ये दिसणारी सपना आता मॉडर्न अंदाजात दिसतेय. परंतु, सपनाच्या देसी लूकवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांना मात्र तिचा हा नवीन लूक फारसा आवडलेला दिसत नाही. 



काही दिवसांपूर्वी सपनानं ग्लॅमरस अंदाजातील फोटोशूटमधील आपले काही फोटो सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले. काहींना सपना या लूकमध्येही भावली. परंतु, अनेकांनी तिच्यावर टीका-टिप्पणीही केली. 


या फोटोंमध्ये सपना शॉर्ट स्कर्टमध्ये दिसतेय. यामुळेच इन्स्टाग्रामवर तिच्या अनेक फॉलोअर्सनं तिच्या या फोटोवर आपली नाराजी व्यक्त करत तिला ट्रोलही केलं.



२०१८ साली सपनानं 'बिग बॉस सीझन ११'मध्ये सहभाग घेतला होता. यामुळे तिच्या आयुष्याला आणि करिअरला वेगळी दिशा मिळाली होती. या वर्षाच्या सुरुवातील सपनानं बॉलिवूडमध्ये डेब्युही केलाय. ती सध्या अनेक प्रोजेक्टसमध्ये व्यग्र आहे. सपना सोशल मीडियावर खूपच ऍक्टीव्ह असते. केवळ इन्स्टाग्रामवर सपनाला १.५ दशलक्षहून अधिक फॉलोअर्स आहेत.