मुंबई : बीटाउनची सर्वात प्रेमळ जोडप्यांपैकी एक म्हणजे कतरिना कैफ आणि विकी कौशलची जोडी. गेल्या काही दिवसांपासून कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीची चर्चा जोरात सुरू आहे. मात्र, कतरिना आणि विकीने याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही आणि या वृत्तांचं स्पष्ट खंडन केलं. अलीकडेच, कतरिना विमानतळावर स्पॉट झाली होती. जिथे तिचे सैल कपडे पाहिल्यानंतर या अटकळांना जोर आला. पण आता कतरिना क्लिनिकबाहेर दिसली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतरिना कैफ दिसली हॉस्पिटलमधून बाहेर पडताना
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही फोटोंमध्ये कतरिना कैफ हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा सैल कुर्ता परिधान केला आहे. यासोबतच तिने मास्क आणि काळा गॉगल घातला आहे. त्याचबरोबर तिच्यापुढेच विकी उभा असल्याचं दिसतोय.


समोर आलेल्या फोटोंमध्ये दोघंही आपाल्या गाडीकडे जाताना दिसत आहे. क्लिनिकच्या बाहेरून कतरिना आणि विकीचा फोटो समोर आल्यानंतर आता हे जोडपं लवकरच आनंदाची बातमी देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.



सैल कपड्यांमध्ये बेबी बंप लपवताना दिसली अभिनेत्री
कतरिनाला सैल कपडे घातलेले पाहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्स असा अंदाज लावत आहेत की, अभिनेत्रीने आपला बेबी बंप लपवण्यासाठी असं केलं आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कतरिना सध्या सलमान खानसोबत 'टायगर 3' मध्ये व्यस्त आहे. मात्र, तिने या चित्रपटाचं शूटिंग जवळपास पूर्ण केलं आहे. याशिवाय तिच्याकडे 'मेरी ख्रिसमस' आणि 'जी ले जरा' सारखे प्रोजेक्टही पाइपलाइनमध्ये आहेत.