Prabhas Kalki 2898 Ad : नागा अश्विन दिग्दर्शित 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत होते. हा चित्रपट याचवर्षी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. तर हा यंदाच्या वर्षीचा बिग बजेट चित्रपट आहे. खरंतर हा चित्रपट आधी जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार होता. आता मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे. तर हा चित्रपट सगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या सगळ्यात आता सेटवरील काही फोटो लीक झाले आहेत. त्यामुळे 'कल्कि 2898 एडी' चे दिग्दर्शक नागा अश्विन यांच्याकडे मागणी केली आहे की त्यांनी यावर कारवाई घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता 'कल्कि 2898 एडी' च्या सेटवर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्याला पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिग्दर्शक नागा अश्विन यांच्याकडे मागणी केली आहे की पुढे जाऊन असे फोटो सेटवरून लीक व्हायला नको, त्यामुळे तुम्ही यासाठी कारवाई करावी. कारण असे फोटो व्हायरल झाल्यानंतर चित्रपट पाहण्याची आतुरता निघून जाते. त्यासोबत निर्मात्यांवर देखील या गोष्टीचा वाईट परिणाम होतो. 



याशिवाय प्रभास आणि दिशा पाटनी यांच्यात एक रोमॅन्टिक सॉन्ग असल्याचं म्हटलं जातं आहे. असं म्हटलं जातं की तिचं या चित्रपटात आयटम सॉन्ग आहे. इतकंच नाही तर काही रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं आहे की दिशाचा या चित्रपटात निगेटिव्ह रोल आहे. तर त्याची सध्या शूटिंग सुरु आहे. त्याशिवाय या चित्रपटात प्रभाससोबत अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, दुलकर सलमान, कमल हासन, विजय देवरकोंडा आणि ज्युनियर एनटीआरसारखे कलाकार दिसणार आहेत. तर हा चित्रपट 9 मे रोजी प्रदर्शित होणार असून सगळ्या भाषेत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 


हेही वाचा : श्वेता तिवारीच्या आयुष्यात तिसऱ्यांदा प्रेमाची एन्ट्री? नेटकरी म्हणाले, 'आता मुलाच्या वयाच्या...'


दरम्यान, प्रभास सगळ्यात शेवटी 'सलार' या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केलं होतं. तर त्याची या चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तर आता प्रेक्षकांना त्याच्या 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटाकडून खूप आशा आहे. आता नक्की हा चित्रपट प्रेक्षकांना जशी आशा आहे, त्यावर खरा उतरणार की नाही याविषयी आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.